पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) डिजिटल दरोडा पडला होत. अवघ्या 2 तास 13 मिनिटात बँकेतील तब्बल 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम गायब झाली होती. बँकिंग विश्वाला हादरवणारी ही घटना 11 आणि 13 ऑगस्टला घडली होती.
कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला अतिशय प्रगत, पूर्वनियोजित, योग्य समन्वय असलेला होता, ज्यात बचावाचे तीन मुख्य स्तर भेदण्यात आले, असं अहवालात म्हटलं आहे.
11 आणि 13 ऑगस्टला कॉसमॉस बँकेतून 94 कोटी रुपये परदेशातील विविध बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले. त्यासाठी मालवेअरच्या सहाय्याने आभासी स्विचिंग सिस्टीम तयार करण्यात आली. या आभासी स्विचिंग सिस्टीमने कॉसमॉस बँकेच्या ऑनलाईन सिस्टीमला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी मागितली आणि कॉसमॉसच्या सिस्टीमने ती दिल्यानंतर पैसे बाहेरच्या देशांमध्ये वळते करण्यात आले.
या सायबर हल्ल्यात खातेदारांची बनावट डेबिट आणि व्हिसा कार्ड तयार करण्यात आली. ती वापरुन 21 देशात वेगवेगळ्या लोकांनी पैसे काढले. प्रत्यक्षात खऱ्या डेबिट आणि व्हिसा कार्डचा वापर झाला नाही. त्यापुढे जाऊन हाँगकाँगमधील हॅनसेन बँकेतील एलएम ट्रेडिंग कंपनीतही स्विफ्ट मेसेजिंग सिस्टिमद्वारे 13 कोटी 50 लाख ट्रान्सफर करण्यात आले.
संबंधित बातम्या :
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब!
EXCLUSIVE पुणे | कॉसमॉस बँकेची खाती हॅक करण्यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा हात : अध्यक्ष मिलिंद काळे
हॅकर्स बँकेवर दरोडा कसा टाकतात?
कॉसमॉस बँक डिजीटल दरोड्याप्रकरणी 28 देशात तपास?
पुणे कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरण, दोन जणांना अटक
पुण्यात कॉसमॉस बँकेची खाती हॅक, 94 कोटींचा अपहार?
पुणे | हॅकर्स बँकेवर दरोडा कसा टाकतात? सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टशी खास बातचित