Pune Nagpur News : काय सांगता! पुणे-नागपूर प्रवास फक्त आठ तासात होणार; नितीन गडकरींची घोषणा
पुणे- नागपूर प्रवास आता आठ तासात शक्य होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे.
Pune Nagpur News : पुणे (Pune)-नागपूर (Nagpur) प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. दोन्ही शराहातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा मनस्ताप आणि वेळ कमी होणार आहे. पुणे-नागपूर प्रवास आता आठ तासात शक्य होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करत ही घोषणा केली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जवळील नवीन प्रस्तावित पुणे-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अॅक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेसवेला जोडला जाईल. यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अडीच तासात आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हा समृद्धी महामार्गने साडेपाच तासात प्रवास करणे शक्य होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
नागपूर ते पुणे रस्त्याने प्रवास करण्यासाठी सध्या सुमारे 14 तास लागतात. त्यामुळे अनेक प्रवाशांचा वेळ हा प्रवासात जातो. या प्रवासात त्यांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर अनेकदा प्रवाशांना या प्रवासात मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांचा वेळ आणि गैरसोय लक्षात घेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Nagpur to Pune journey will be possible in eight hours!
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 30, 2022
Considering the inconvenience to commuters currently traveling from Nagpur to Pune, the Nagpur-Mumbai Samridhi Mahamarg will be connected to the newly proposed... pic.twitter.com/BuxTgEuZ8d
पुणे- औरंगाबाद महामार्गाचा संभाव्य नकाशा जाहीर
राज्यात समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचं अंतर कमी होणार आहे. पुढील महिन्यात मा मार्गाचं लोकार्पणदेखील होणार आहे. याच दरम्यान नितीन गडकरींनी नागपूर-पुण्याचं अंतर कमी करण्याची घोषणा केली आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला औरंगाबादजवळ नवीन पुणे औरंगाबाद ग्रीन एक्स्पेस वे जोडण्यात येणार आहे. दोन महत्वाच्या शहराचं अंतर कमी करण्यासाठी ही घोषणा केली आहे त्यासोबतच पुणे-औरंगाबाद महामार्गाचा संभाव्य नकाशा देखील जाहीर केला आहे.
पुणे बंगळुरु अंतर केवळ सात तासात
भारतातील सर्वात मोठं आयटी हब म्हणून ओळख असणारं बंगळुरु (Pune-Mumbai-Banglore) आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणारी मुंबई, या दोन शहरांत वारंवार ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. आता मुंबई किंवा पुण्याहून बंगळुरुपर्यंतचं अंतर केवळ सात तासांत पार करता येणार आहे. मुंबई आणि पुण्याहून महामार्ग थेट बंगळुरुपर्यंत जोडला जाणार आहे. आयटी हब असणाऱ्या बंगळुरुला आणखी एक महामार्ग जोडला जाणार आहे. सध्या हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गासाठी अंदाजे 50,000 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच, हा महामार्ग तब्बल 699 किलोमीटर लांबीचा असणार असल्याची माहिती मिळत आहे.