एक्स्प्लोर

Nitin Gadkari: पुण्याला जुने दिवस आणा, पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या; नितीन गडकरींचे आवाहन

मंत्र्यांच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनांचे सायरन काढणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केलीये. लवकरच कर्णकर्कश हाॅर्न ऐवजी मधूर आणि सुरेल भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवण्यात येणार आहे. 

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्यात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पुणे अजून वाढवू नका,पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे आवाहन  नितीन गडकरी यांनी केले आहे. पुण्याला जुने दिवस आणा, पुण्याला प्रदूषणापासून मुक्त करा, अशी विनंती देखील नितिन गडकरी यांनी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली आहे. 

नितीन गडकरी म्हणाले, पुणे आता अधिक वाढवू नका.  पुणे प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला  रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा येत होती.  परंतु आता ही हवा हरवली आहे. पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे. यामुळे आता पुणे अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषीत करु नका. 

पुण्यातून पेट्रोल डिझेल हद्दपार करा

पुण्याला पेट्रोल,डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा.  मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे.  इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करू नका, ग्रीन हायड्रोजनचा वापक करा. मी स्वत: दिल्लीत हायड्रोजनवर चालणारी कार वापरतो.

मंत्र्यांच्या ताफ्यात  असणारे सायरन  बंद करणार 

मंत्र्यांच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनांचे सायरन काढणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केलीये.  लवकरच कर्णकर्कश हाॅर्न ऐवजी मधूर आणि सुरेल भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवण्यात येणार आहे. 

पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी करा

पुण्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर कचऱ्याची देखील मोठी समस्या आहे.  पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही.  आम्ही आमचे टॉयलेटचे पाणी विकून 300 कोटी रुपये कमावतो. मी पन्नास हजार कोटीत पुण्याचे सर्व उड्डाणपूल बांधून द्यायला तयार आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले. 

चांदणी चौकाचे नाव दोन दादांनी मिळून ठरवा, मी मान्यता देईल

नितीन गडकरी म्हणाले, पुण्याला बडल इंजिन लागले.  दोन दादा एकत्र आले आहेत.  आमचे डिपार्टमेंट वेळेत भ्रष्टाचारमुक्त आणि काम पूर्ण  करण्यासाठी ओळखले जाते.म्हणून मी ठेकेदारांना देखील तंबी देतो.  चांदणी चौकाचे नाव जे काही आहे ते अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांनी मिळून  ठरवावे,मी त्याला मान्यता देईल.

हे ही वाचा :

 पुण्याच्या वाहतूक कोंंडीवर गडकरींचा रामबाण उपाय; सुरु होणार हवेतून चालणाऱ्या बसेस

महत्त्वाच्या बातम्या

Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget