Pune Crime News:  पुण्यातल्या बाणेरमधील नालंदा गार्डन या ठिकाणी एक नायजेरियन पती-पत्नी राहत असून ते राहत्या घरातून कोकिन एमडी असे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत या नायजेरियन पतीपत्नीला ताब्यात घेतले आहे. पती उगुचुकु इम्यन्युअल तर पत्नी ऐनीबेली ओमामा व्हीआन अशी दोघांची नाव असून मूळचे नायजेरियन  आहेत सध्या राहायला ते बाणेरमध्ये राहत आहेत. त्यांनी पुण्यात या अमली पदार्थांचा व्यवसाय करण्याचं ठरवलं होतं. मात्र पोलीसांनी त्यांना त्याआधीच ताब्यात घेतले आहे.



बेकायेशीररित्या पुण्यात विकण्यासाठी आणलेल्या 644 ग्रॅम एम. डी. 201 ग्रॅम कोकेन,मोबाईल,इलेक्ट्रिक वजन काटा,प्लास्टिक पिशव्या आणि डबा असा 1 कोटी 31 लाख 8 हजराचा अमली पदार्थ आणि ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. एन. डी. पी. सी. ॲक्ट नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.


यापुर्वी  कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन टांझानियन नागरिकांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. 46 वर्षीय अब्दुल्ला रामदानी  आणि 47 वर्षीय राजाबू हरेरे सल्लेह अशी अटक केलेल्यांची नावे होती. यापूर्वी मुंबईत अब्दुल्लावर अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल झाला होता. दोघेही उंड्री येथील रहिवासी असून ते मुळ टांझानियाचे आहेत.


अब्दुल्ला रामदानी आणि राजाबू हरेरे सल्लेह हे दोघे आरोपी वैद्यकीय व्हिसावर भारतात आला होते. मात्र पुण्यात ते अमली पदार्थाचा व्यापार करत होते. गुप्त माहितीवरून कारवाई करत कोंढवा परिसरातील धर्मवत पेट्रोल पंपाजवळ त्यांना पकडण्यात आले. आता त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपास पथकात पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, तसेच राहुल जोशी, विशाल दळवी, नितेश जाधव, योगेश मोहिते यांचा समावेश होता. नायजेरीयन आणि टाझानियाच्या या दोन्ही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.