Sunil Tatkare on Supriya Sule Post: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी या योजनेच्या माधयमातून महिला वर्गापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे, तर विरोधक आगामी निवडणुकीसाठीचा हा जुमला आहे, असं म्हणत टीका करत आहे. अशातच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात देखील झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. मात्र याचदरम्यान (राष्ट्रवादी काँग्रेस) शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांना डिवचलं आहे, तर अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) आम्हाला मी असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे नैराश्यातून बोलत आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली आहे. (Sunil Tatkare on Supriya Sule Post)


सुळेंच्या पोस्टवर तटकरेंची प्रतिक्रिया


आम्ही सुरू केलेली योजना क्रांतीकारी ठरत असल्यामुळे अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) नैराश्य आलं असेल. आता आमची यात्रा जोरात सुरू अनेक कार्यक्रम होत आहेत लोकांचं चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे कोल्हेंना नैराश्य आलं आहे, असं यावेळी तटकरे म्हणाले, तर सुळेंच्या पोस्टवर बोलताना ते म्हणाले, सुप्रिया सुळे (Supriya Sule) अलिकडे असं का बोलत आहेत मला कळत नाही, कोणी कोणावर बळजबरी करण्याचं कारण नाही, गेल्या काही दिवसांत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे, कोण कोणाला सक्ती करणार नाही, हा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या या आरोपावर लक्ष देण्याचं कारण नाही, अजित दादांना मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून त्यांना नैराश्य आलं असल्याचंही यावेळी तटकरे (Sunil Tatkare)  म्हणाले आहेत. 






सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?


सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मिडीया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मोबाईवरील एक मेसेजचा फोटो शेअर करत एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा, असं आव्हान दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत... बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार... अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असं सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) म्हटलं आहे.


 


संबंधित बातमी:


'एकातरी लाडकी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा'; सुप्रिया सुळेंचं आव्हान, शेअर केला धक्कादायक फोटो


लाडकी बहीण योजनेचे लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!