एक्स्प्लोर
शरद पवारांचे नातू रोहित पवारांवर रुग्णालयात अॅडमीट होण्याची वेळ, फेसबुक पोस्टद्वारे माहिती
कोणतीही गोष्ट अंगावर काढली की वाढत जाते आणि हॉस्पीटलचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस रुग्णालयात अॅडमीट व्हावं लागलं असून ऑपरेशन करावे लागलं असल्याची माहिती या पोस्टद्वारो दिली आहे.
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना हडपसरच्या नोबेल रुग्णालयात दाखल केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी रुग्णालयात अॅडमीट असल्याची खुद्द रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.
कोणतीही गोष्ट अंगावर काढली की वाढत जाते आणि हॉस्पीटलचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस रुग्णालयात अॅडमीट व्हावं लागलं असून ऑपरेशन करावे लागलं असल्याची माहिती या पोस्टद्वारो दिली आहे.
हॉस्पीटलचे डॉक्टर, नर्सेस यांनी अहोरात्र काळजी घेतल्याने मी आत्ता पुर्णपणे बरा असून पुन्हा त्याच जोशाने प्रचारास सुरवात करत असल्याचेही सांगितले आहे. तसेच आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहात. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, पण आपण देखील तब्येतीची काळजी घेण्याची विनंती रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केली आहे.
रोहित पवारांची फेसबुक पोस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement