Supriya Sule: पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं यामध्ये त्यांना कोणताही इजा झाली नाही.  खासदार सुप्रिया सुळे पुण्यात एका कार्यक्रमाला आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या दीप प्रज्वलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली. सुदैवाने यामध्ये त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. 


हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचं प्रशिक्षण केंद्र आहे. त्या क्लासचे आज उद्घटन होतं. याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांना बोलवलं होतं. यावेळी दीप प्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule)  साडीला आग लागली. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीनं साडीला आग लागल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी तात्काळ साडीला लागलेली आग विजवण्यात आली. नशीब बलवत्तर होतं म्हणून मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांना कोणताही इजा झालेली नाही. त्या सुखरुप आहेत. 


कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढील कार्यक्रमाला गेल्या. यावेळी त्यांनी इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे आज पुण्यात अनेक कार्यक्रम आहेत.  या कार्यक्रमानंतर त्या जळलेल्या साडीच्या निशाणासह सुप्रिया सुळे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. 


पाहा व्हिडीओ






आणखी वाचा:
Pune News : पुणे शहरातील 2000 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता, मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल- देवेंद्र फडणवीस