Maharashtra News : अजित पवार (Ajit Pawar) यांना राष्ट्रवादी (NCP) पक्ष (Party) आणि चिन्ह (Symbol) मिळालं. निवडणूक आयोगाच्या (Election Commision) या निर्णयामुळे सर्वसामान्यांना चांगलाच धक्का बसला आहे. यानंतर अजित पवार गटात जल्लोषाचं वातावरण आहे, तर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी अजित पवारांची असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. राज्याच्या राजकारणातील या घडामोडींवर सर्वसामान्यांची काय प्रतिक्रिया आहे, हे 'एबीपी माझा'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालं. या राजकारणातील घडामोडींवर सर्वसामान्यांची काय प्रतिक्रिया आहे, जाणून घ्या.


राजकारणातील घडामोडींवर सर्वसामान्यांचं मत काय?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल योग्य आहे की अयोग्य? हे पिंपरी चिंचवड करांकडून एबीपी माझाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोबतच या निर्णयानंतर शरद पवारांपेक्षा अजित पवार सरस ठरले आहेत का? शरद पवारांचा पराभव झाला का? राजकारणी जनतेच्या हितासाठी हे सगळं करतायेत की स्वतःच्या स्वार्थासाठी? हे खरंच घडतंय की हा ड्रामा आहे? या प्रश्नांवर पिंपरी चिंचवडकरांना बोलतं केलं आहे.


 


निवडणूक आयोगामध्ये माहिती सादर करण्यासाठी दुपारपर्यंत मुदत



शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्ष चिन्ह याबाबत निवडणूक आयोगामध्ये माहिती सादर करायचे आहे जर माहिती आज दिली गेली नाही तर त्यांना स्वतंत्र गट समजला जाईल. शरद पवार गटाकडून पक्ष चिन्ह ठरला असून दुपारपर्यंत निवडणूक आयोगामध्ये ही माहिती दिली जाईल. पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रवादी हा शब्द आहे तर चिन्ह हे सर्वसामान्य जीवनाशी संबंधित वस्तू असण्याची शक्यता आहे.



अजित पवार गटाचा काटेवाडीत जल्लोष


उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर काटेवाडीत जल्लोष करण्यात आला. लाडू भरवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर त्यावेळी शरद पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ज्या शरद पवारांच्यासाठी फटाके वाजवले त्यांचाच पक्ष काढून घेतल्यानंतर हे जल्लोष करतात असे मत शरद पवारांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.