एक्स्प्लोर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, संजीव पुनाळेकर-विक्रम भावेला 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर नरेंद्र दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. यावेळी सीबीआयच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

या खटल्यामध्ये खून, कट रचणे आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक अधिनियमानुसार तपास करण्यात येत आहे. त्यामुळे पुनाळेकर आणि भावे यांच्या चौकशीसाठी 14 दिवस सीबीआय कोठडीची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.

मात्र, बचाव पक्षाच्या वतीने सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला होता. तसेच संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावरील आरोप जामीनपात्र असल्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी ही बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र गेल्या सात दिवसात सीबीआयला कुठलीही माहिती संजीव पुनावळेकर यांच्याकडून मिळालेली नाही.

संजीव पुनाळेकर-विक्रम भावेवरील आरोप

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर नरेंद्र दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत.

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी मदत केली होती. त्याचबरोबर हत्येवेळी दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता.

संजीव पुनाळेकर दाभोलकर आणि पानसरे हत्याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात बाजू मांडत आहेत. तसेच पुनाळेकर या प्रकरणातील फरार आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय सीबीआयला आहे.

विक्रम भावेला 2008 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळ झालेल्या बॉंबस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जामिनावर सुटल्यावर तो वकील संजीव पुनाळेकरला मदत करत होता. पुनाळेकरने शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला मुंबईतील खाडी पुलावरुन शस्त्र फेकून देऊन नष्ट करण्याची सूचना केली, त्यावेळी विक्रम भावे तेथे हजर होता.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला एटीएसनं अटक करण्यात आली होती. दोघांच्या चौकशीत एटीएसला पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाचे धागेदोरे सापडले. त्यानंतर दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर अंदुरे आणि कळसकर हेच दोघे असल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या दोघांचा ताबा सीबीआयनं घेतला आणि त्यांच्याविरोधात तपास सुरू केला.

VIDEO | स्पेशल रिपोर्ट : पुणे : डॉ. दाभोलकर हत्या, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget