एक्स्प्लोर
'मुख्यमंत्री फडणवीस जातीयवादी आहेत', नारायण राणेंची जोरदार टीका

पिंपरी-चिंचवड: 'महाराष्ट्राचे सरकार आणि खुद्द मुख्यमंत्री जातीयवादी आहेत', असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नारायण राणे यांनी केला आहे. इतकंच नाही तर जाती-जातीत तेढ निर्माण करून जातीयवादी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेतील वरिष्ठ नेते करत आहेत असा आरोप राणेंनी केला आहे. ते पिंपरीतल्या दापोडीमधील काँग्रेस मेळाव्यात बोलत होते. 'भाजप 'अच्छे दिन'च्या आशेवर दोन वर्षांपासून देशातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांची रोज फसवणूक करीत आहे.' अशी जोरदार टीका त्यांनी केली. 'मागील दोन वर्षात भाजप सरकारनं केलेलं एक तरी विधायक काम सांगाव आणि आमच्याकडून एक लाख रुपये घेऊन जावे.' असं आव्हानही त्यांनी दिले. शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणी विचारत नाही आणि हे दुसऱ्या राज्यात निवडणुका लढवायला निघाले आहेत असं म्हणत नारायण राणेंनी गोव्यातील निवडणुकीवरुन शिवसेनेचीही खिल्ली उडवली.
Before You Go
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा





















