एक्स्प्लोर

LIVE : नयना गँगरेप प्रकरणी वकिलांकडून निर्भयाचा दाखला

पुणे : पुण्यातील नयना पुजारी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिघांवर बलात्कार, हत्या, अपहरण आणि चोरीचा आरोप सिद्ध झाला आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सुटका करण्यात आली. कोर्टात काय झालं? शिक्षेची सुनावणी सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र पोलिसांनी तासभर आधीच आरोपींना कोर्टात हजर केलं होतं. न्यायाधीशांनी योगेश राऊतला समोर बोलावून 'शिक्षेबद्दल काही बोलायचं आहे का?' असं विचारलं. 'मला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. मी गुन्हा केलेला नाही. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा.' असं योगेश म्हणाला. 'माफीचा साक्षीदार झालेला राजेश चौधरीही गुन्ह्यात सहभागी होता. आम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर त्यालाही द्या.' अशी मागणीही योगेश राऊतने केली. महेश ठाकूरलाही न्यायाधीशांनी पुढे बोलावून शिक्षेबाबत विचारलं, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. विश्वास कदमला विचारलं असता हा गुन्हा माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. सरतेशेवटी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेचा दाखला दिला.

नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी योगेश कसा अडकला?

काय आहे प्रकरण? सिनिक्रॉन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या नयना पुजारीचं लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 7 ऑक्टोबर 2009 रोजी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर नयनावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

नयना पुजारी हत्याकांड: बलात्कार, खून, अपहरणाचे आरोप सिद्ध

योगेश राऊत या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर या खटल्याला सुरुवात झाली. गेल्या सात वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. अटकेनंतर एकदा योगेश राऊत रुग्णालयातून पळून गेला होता. दीड वर्षं दिल्लीत वेशांतर करुन राहणाऱ्या योगेशला शिर्डीमध्ये पोलिसांनी अटक केली होती. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नयनाचे पती अभिजीत पुजारींसह तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांच्या ढिसाळपणावर ताशेरे ओढत न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयात आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

महत्त्वाच्या बातम्या

अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं, पुरुषोत्तम जगतापांबाबत काय म्हणाले जय पवार?
शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं, पुरुषोत्तम जगतापांबाबत काय म्हणाले जय पवार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget