पुणे : नगर -कल्याण महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि दुधाच्या ट्रॅंकरने समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दुर्दैवाने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. हे सगळे पांगरी गावाचे रहिवासी असून जखमी झालेल्यांमध्ये दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.