एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज दोन तास बंद राहणार
ओव्हरहेड गँट्रीज बसवण्याच्या कामासाठी वाहतूक दोन तास बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

रायगड : तुम्ही आज रस्तेमार्गे मुंबईहून पुण्याला जात असाल तर प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील वाहतूक आज (10 जानेवारी) दोन तास बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद राहिल. ओव्हरहेड गँट्रीज बसवण्याच्या कामासाठी वाहतूक दोन तास बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या कामामुळे मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने एक्स्प्रेसवेवर ओव्हरहेड स्ट्रक्चर अर्थात गँट्री बनवण्याचं काम हाती घेतलं. आहे. या कामाअंतर्गत वाहनचालकांच्या सोयीसाठी एक्स्प्रेसवेवर साईनबोर्ड आणि व्हिडीओ मेसेज लावले जाणार आहेत. या कामादरम्यान अवजड वाहनांची रस्त्याशेजारी थांबवले जातील. तर वाहनचालकांच्या मार्गदर्शनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवलं जाण्याची शक्यता आहे.
Before You Go
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं





















