एक्स्प्लोर

1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल 18 टक्क्यांनी महागणार

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ज्या वाहनधारकांना सध्या 195 रुपये टोल द्यावा लागतो, त्यांना 1 एप्रिलपासून 230 रुपये मोजावे लागतील. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये 18 टक्क्यांनी वाढ केली जाईल, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती, असं सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एक्स्प्रेस वेचा बांधकाम खर्च वसूल : माहिती अधिकार कार्यकर्ते दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वे तयार करण्यासाठी आलेला खर्च अगोदरच वसूल झाला आहे. पुण्यातील विवेक वेलणकर, संजय शिरोडकर यांच्यासह चार माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक्स्प्रेस वेवरील आतापर्यंत वसुल केलेल्या रकमेची माहिती मागवली होती. राज्य सरकार आणि बांधकाम कंपनी आरबीआय इन्फ्रास्ट्रक्चर यांनी एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी खर्च केलेली रक्कम वसूल झाली आहे. शिवाय त्या रकमेपेक्षाही अधिकचा नफा कंपनी आणि राज्य सरकारला झाला आहे, असं माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकामाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शिवाय कोर्टात जाण्याचा इशाराही दिला होता. एक्स्प्रेस वेवरुन नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या टोलवाढीला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे ही टोलवाढ थांबवली जाईल का, ते पाहणं महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget