एक्स्प्लोर

पुणे-मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर, डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळ कमी होणार

सध्या डेक्कन क्वीन पुण्याहून सकाळी 7.15 वाजता निघते आणि मुंबई सीएसएमटीला 10 वाजून 25 मिनिटांनी पोहचते. तर मुंबईहून संध्याकाळी 5.10 वाजता निघणारी डेक्कन पुण्याला रात्री 8.25 ला पोहचते. म्हणजेच सध्या या प्रवासाला साधारण सव्वातीन तासांचा अवधी लागतो.

मुंबई : डेक्कन क्वीनने प्रवास करणाऱ्या मुंबई-पुण्याच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. डेक्कन क्वीनचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. त्यामुळे दररोज ट्रेनने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नोकरदारांचा वेळ वाचणार आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये नवीन लिंक होमन-बुश रेक वापरण्यात येणार आहे. यामधील 'पुश अँड पुल' तंत्रज्ञानामुळे दोन्ही शहरांमधील अंतर 30 ते 35 मिनिटांनी कमी होणार आहे. पुढील काही महिन्यात हे नवीन रेक जोडले जाण्याची शक्यता आहे. सध्या डेक्कन क्वीन पुण्याहून सकाळी 7.15 वाजता निघते आणि मुंबई सीएसएमटीला 10 वाजून 25 मिनिटांनी पोहचते. तर मुंबईहून संध्याकाळी 5.10 वाजता निघणारी डेक्कन पुण्याला रात्री 8.25 ला पोहचते. म्हणजेच सध्या या प्रवासाला साधारण सव्वातीन तासांचा अवधी लागतो. दररोज डेक्कन क्वीन प्रवास करणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या घरात आहे. यापैकी बहुसंख्य प्रवासी हे पुण्यात राहून मुंबईत काम करणारे वकील, सरकारी कर्मचारी किंवा तत्सम व्यावसायिक आहेत. त्यांचा दिवसभरातील तासाभराचा वेळ आता वाचू शकेल. डेक्कन क्वीन ही सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसनंतर लिंक होमन-बुश रेक पद्धत वापरणारी मध्य रेल्वेवरील दुसरी ट्रेन ठरणार आहे. पुश अँड पुल टेक्निकमध्ये पुढे आणि मागे असे दोन लोकोमोटीव्ह असतात, यामुळे ट्रेनला स्थैर्य येतं. वळणांवर गती कमी-जास्त करण्यात लागणारा वेळ आणि हिसके यामुळे कमी होतात. डेक्कन क्वीन डेक्कन क्वीन ही अनेक प्रवाशांसाठी जणू दुसरं घरच आहे. वर्षभरातील अनेक सण-उत्सव, आनंदाचे सोहळे डेक्कनमध्ये साजरे केले जातात. गेली जवळपास 90 वर्ष डेक्कन क्वीन प्रवाशांच्या दिमतीला आहे. डेक्कन क्वीनचा इतिहासदेखील मोठा आहे. 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला. डेक्कन क्वीन ही पहिली सुपरफास्ट डिलक्स ट्रेन म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला तिला केवळ 7 डबे होते. नंतर ते 12 करण्यात आले आणि आता 17 डबे घेऊन ही गाडी धावते. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे, जिला डायनिंग कार आहे. म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेल सारखे बसून खण्याची सोय आहे. पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारी ही गाडी दोन्ही शाहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. कित्येक वर्षे डेक्कन क्वीनने दररोज पुणे- मुंबई- पुणे प्रवास करणारे प्रवासी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget