पुणे : डिजिटल इंडिया म्हणत आपण सर्वजणच मोबाईल (Mobile), इंटरनेटच्या जगात वावरतोय. मात्र, केवळ तरुण, वयोवृद्धच नाही, तर लहानगी मुलेही तासनतास मोबाईलवर आपला वेळ घालवताना दिसून येतात. अनेकदा, मोबाईलवर लहान मुलं नको ते बघतात आणि नको-नको ते करुन बसतात. हेच सगळं घडू नये म्हणून आपल्या घरातील सदस्यांकडून काळजी घेतली जाते. मात्र, दाऊदी बोहरा समाजाच्या (Bohara) धर्मगुरुंनी 15 वर्षाखालील मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका, असं फर्मानच काढलं आहे. या फर्मानाची सध्या समाजात आणि सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगत आहे. धर्मगुरुंनी काढलेलं हे फर्मान नेमकं काय आहे, अन् त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेऊयात. 


अन्न, वस्त्र, निवारा अन् मोबाईल. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग बनले आहेत. त्यात लहान मुलांच्या हातातलं खेळणंही सध्याच हेच बनल्याचं दिसून येतं. जेवण करताना मोबाईल, घरी असताना मोबाईल, तसंच झोपताना देखील मोबाईलचा वापर होतो. हाच वापर टाळण्यासाठी आणि पुढच्या पिढीला नीट वळणं लावण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी 15 वर्षाखालील मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका, असं फर्मान काढलं आहे. मुंबईत झालेल्या व्याख्यानात त्यांनी यासंदर्भात सूचना दिल्या अन् एका क्षणात सगळ्या बोहरा सामाजाने या निर्णयाचं स्वागत केलं.


या सूचना किंवा विनंती समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी धर्मगुरुंच्या टीमने व्हॉट्सअप मेसेज केला, त्यात विविध सूचना केल्या. धर्मगुरुंच्या एका विनंतीवरुन थेट पालकांनी आपल्य़ा मुलांना हे फर्मान सांगितलं. हट्टी, खोडकर आणि वारंवार मोबाईल पाहणारी मुलं, मोबाईलसाठी जिद्द करणारी मुलं, धर्मगुरुंच्या या फर्मानानंतर शांत झाली आणि त्यांनी मोबाईल वापरण्याचं बंद केल्याचं पुण्यात बोहरी आळीत राहणाऱ्या बोहरा समाजाचं कुटुंब सांगतं होते. मोबाईलने डोळे खराब होतात, स्क्रिन टाईम वाढला.. गेम्स खेळले तर हे वाईट आहे, असं धर्मगुरु म्हणाले. त्यामुळे मोबाईल वापरणं सोडलं आणि थेट मैदानी खेळात रमताना ही मुले दिसत आहेत. दारुदी बोहरा समाज हा अल्पसंख्यांक समाज आहे. धर्मगुरुंच्या आदेशाचं पालन करणारा समाज आहे. त्यामुळे धर्मगुरुंच्या या निर्णयाची अंमलबजावणी एका झटक्यात झाली. याच समाजाचा हा निर्णय येणाऱ्या पिढीला अनेक गोष्टींपासून वाचवू शकतो, असेही म्हटले जाते. 


ऑस्ट्रेलिया व स्वीडनमध्येही उचललं पाऊल


मोबाईल आणि त्यासोबत आलेलं इंटरनेट नव्या युगाचं वरदान म्हणून पाहिलं गेलं. पण वापराचा अतिरेक झाला आणि हे वरदान शाप ठरायला लागलं. त्यातूनच ऑस्ट्रेलिया आणि स्वीडनसारख्या देशांनी नव्या पिढीला या शापापासून वाचवण्यासाठी पावलं उचलायचं ठरवलं. भारतात बोहरा समाजाने हा मार्ग स्वीकारलाय. इतरांकडून याचं अनूकरण व्हायचं असेल तर त्याची सुरुवात पालकांना स्वतःच्या सोशल मीडीयाच्या वापराबाबत संयम दाखवून करावी लागणार आहे.


हेही वाचा


Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले