एक्स्प्लोर

Pune Crime News: रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून बघरे यांना, यांची आज विकेटच टाकू', धुमाळ यांच्यावर फायरिंग करण्यापूर्वी घायवळ टोळीची दादागिरी, नेमकं काय घडलं?

Pune Crime News: धुमाळ हे मित्रांसोबत रस्त्यावर गप्पा मारत उभे असताना, दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी त्यांच्याशी वाद घालत मयूर कुंबरे याने पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी धुमाळ यांच्या मांडीला लागली. जीव वाचवण्यासाठी ते जवळील पाण्याच्या टाकीआड धावले.

पुणे: पुणे शहरात टोळीयुध्दानंतर आता सामान्य माणसांवर या टोळीतील सदस्यांनी हल्ले करण्यास सुरूवात केली. कोथरूड परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या दुहेरी हल्ल्यामुळे (Pune Kothrud Crime News) पुन्हा एकदा निलेश घायवळ टोळी चर्चेत आली आहे. गाडीला साइड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार झाला, तर त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दुसऱ्या इसमावर कोयत्याने वार करण्यात आला. ही घटना कोथरूड पोलिस (Pune Kothrud Crime News) ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर, मुठेश्वर मित्रमंडळाजवळ बुधवारी (दि.१७) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. गोळीबारात प्रकाश मधुकर धुमाळ (३६, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) गंभीर जखमी झाले असून सध्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धुमाळ हे मित्रांसोबत रस्त्यावर गप्पा मारत उभे असताना, दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी त्यांच्याशी वाद घालत मयूर कुंबरे याने पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी धुमाळ यांच्या मांडीला लागली. जीव वाचवण्यासाठी ते जवळील पाण्याच्या टाकीआड धावले.(Pune Kothrud Crime News) 

या घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटांतच घायवळ टोळीच्या त्याच गुंडांनी जुन्या वादातून वैभव तुकाराम साठे (१९, रा. श्रीकृष्णनगर, सागर कॉलनी, कोथरूड) याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. दोन्ही घटनांप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांच्यासह अन्य आरोपींवर विविध कलमांसह आर्म्स अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. रोहित आखाडे, गणेश राऊत आणि मयूर कुंबरे हे निलेश घायवळ टोळीतील सराईत गुंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, धुमाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यात तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही तक्रारींत काय म्हटलंय

धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी 'तुला लय माज आला आहे का? इथे कशाला थांबला आहे. हा आमचा एरिया आहे, असे म्हणत रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून बघरे यांना, यांची आज विकेटच टाकू' असे म्हणत गोळीबार केला. तेथून पुढे १० मिनिटांनी आरोपींना वैभव साठे हा त्याचे मित्र सुनील हरळय्या आणि यश गोडावत यांच्यासोबत सागर कॉलनी येथील एका घरासमोर बसलेला दिसला.

मयूर कुंबरे आणि सुनील हरळय्या यांच्यातील जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सुनील याला शिवीगाळ करीत 'याला मारून टाका, सोडू नका' असे म्हटल्याने हरळय्या तेथून पळून गेला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी आपला मोर्चा वैभव साठे याच्याकडे वळवत 'त्याच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का... तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने वैभव साठेवर हल्ला केला', असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज

Embed widget