एक्स्प्लोर

Pune Koyta Gang : गुन्हेगारीविरोधात पुणे पोलिसांनी कंबर कसली; 700 गुन्हेगारांची झाडाझडती

शहरातील 3,765 गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झालं.

Pune Koyta Gang : पुण्यातील 'G-20' परिषद आणि वाढत्या (Pune Crime News) दहशतीच्या घटनांपूर्वी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. रोज नवे धाडसत्र सुरुच आहे. पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन राबवलं. त्यात अनेक गुन्हेगारांंची झाडाझडती सुरु केली आहे. त्यात शहरातील 3,765 गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झालं. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, 145 कोयते जप्त करण्यात आले.

पोलीस आयुक्त रतेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, डीसीपी अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. विजयकुमार मगर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

पुण्यात मागील काही दिवसांपासून शहरातील हॉटेल, लॉज, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. सिंहगड रोड पोलिसांनी धायरी परिसरात राहणाऱ्या नीलेश शिवाजी गायकवाड (वय 35 वर्षे) याला अटक करुन त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 43 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 145 कोयते, तलवारी अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. 

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा येथील अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का पार्लरचा मालक शाहरुख हारु शेख (वय 25 वर्षे) याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्क्याची भांडी आणि सुगंधी तंबाखू जप्त केला. नायलॉन मांजाची अवैध विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 88 जणांना अटक केली.

कोयता विक्रेत्यावर कारवाई

मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. यामुळे पुणे पोलिसांनी थेट कोयता विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकला आहे. पुण्यातील भोरी आळी या परिसरात अनेक लहान-मोठे दुकानं आहेत. याच परिसरातील दुकानावर छाटा टाकला आहे आणि दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले 105 कोयते जप्त केले. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शहरात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. त्यांना बेड्या ठोकण्याचं पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यापूर्वी पुणे पोलिसांनी कोयता पुरवणाऱ्या विक्रेत्याला अटक केली आहे.

संबंधित बातमी-

Pune Koyta Gang : कोयता गॅंगची दहशत रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा 'मास्टर प्लॅन' तयार

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Embed widget