पुणे : मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन (Maratha Reservation)  मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची आंतरवाली सराटीनंतर (Antarwali Sarati) आज थेट पुणे जिल्ह्यात तोफ धडाडणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज जरांगे पाटील सभा घेणार आहे. या सभेसाठी लाखो मराठे पुन्हा एकवटल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यात मराठे एल्गार करणार आहेत. या मॅराथॉनसभेला लाखो मराठे हजेरी लावणार आहेत.


मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वीच जरांगे पाटलांनी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांच्या दौऱ्यातून दिसून येत आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून मराठ्यांनी पाठिंबा दिला होता शिवाय आंतरवाली सराटीतील सभेतदेखील सर्व महाराष्ट्रातून मराठे कोसोदूर प्रवास करत  आले होते. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील मराठ्यांचा यात सहभाग होता. आज पुणे जिल्ह्यातही तशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळणार आहे. प्रत्येक सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या सभेची तयारी करण्यात येत आहे. आता या सभेत जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


आज जरांगे पाटलांचा दौरा कसा असेल?


-सकाळी सात वाजता जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांंच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे.


-त्यानंतर ते 10 वाजता जुन्नरला येणार आहे. तिथे त्यांचं जय्यत स्वागत करण्यात येणार आहे.


- सकाळी 11 वाजता त्यांनी खेड राजगुरुनगरमध्ये सभा होणार आहे.


-खेडची सभा झाल्यानंतर 3 वाजता त्यांची बारामतीत सभा होणार आहे. बारामतीत तीन हत्ती चौकात ही सभा होणार आहे.


- 5 वाजता फलटण आणि त्यानंतर रात्री 8 वाजता दहिवडीत भेट देणार आहेत. 


राजगुरुनगरच्या सभेची जय्यत तयारी...


मराठा क्रांती मोर्चातर्फे 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सभेसाठी 100 एकर जागा निश्चित केली आहे. या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली. या ठिकाणी कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर हीट असल्यामुळे तशा उपाययोजना सभास्थळी करण्यात आल्याची माहिती आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Maratha Reservation : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकारण्यांना गावबंदी; नगरच्या पाथर्डीमध्ये लागला भलामोठा फ्लेक्स