पुणे : कोरोना काळात राज्य सरकारच्या मंत्र्यांनी लाखो रुपयांची बिलं राज्य सरकारच्या तिजोरीतून भरल्याचा उघड झालं आणि एकच टीका झाली. आता जसे नेते तसेच त्यांचे अनुयायी हे काही वेगळे सांगायला नको... पुणे महापालिकेतही शंभरच्यावर नगरसेवकांनी गेल्या दोन वर्षात वैद्यकीय उपचारांच्या बिलापोटी आठ कोटी रुपये वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. 


पुणे महानगरपालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांनी 2021- 22 साली वैद्यकीय बिलापोटी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल चार कोटी वीस लाख रुपये तर 2020 - 21 या सालात 419 बिलांसाठी तब्बल चार कोटी 36 लाख 84 हजार 790 रुपये वसूल केले आहेत.  याचा अर्थ कोरोनाच्या दोन वर्षात तब्बल साडेआठ कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम आजी-माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय बिलापोटी खर्च करण्यात आली आहे. 


 महापालिकेच्या नगरसेवकांपैकी सुमारे शंभरपेक्षा जास्त नगरसेवकांनी दोन वर्षात आठ कोटी रुपये वैद्यकीय बिलापोटी वसूल केले आहेत. अगदी बजेटमध्ये तरतूद नसतानाही वर्गीकरण करून नगरसेवकांना वैद्यकीय बिल देण्यात आली आहेत. मात्र एवढं सगळं करायची गरज काय असा प्रश्न उपस्थित होतोय. सदन नसलेल्या नगरसेवकांनी स्वतःच्या कुटुंबासह स्वतःचा इन्शुरन्स केला तर वैद्यकीय बिलापोटी मिळणारे सगळे पैसे त्यांना परत मिळू शकतील. मात्र असं करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या करातून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग वैयक्तिक औषधोपचारांसाठी करणे किती योग्य असा प्रश्न आहे.


महापालिकेत येणारा पैसा नागरिकांनी कर म्हणून भरलेला असतो. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ही विमा उतरवून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सोय करून दिली जाते. नगरसेवकांच्या बाबतीत मात्र अस होत नाही. महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येत स्वतःच्या फायद्यासाठीचे निर्णय घेतात. किमान आता होत असलेली टीका पाहता आता तरी सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. 


संबंधित बातम्या :


Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 153 कोरोना रुग्णांची नोंद तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 943 वर


Corona Cases : देशात पुन्हा वाढला कोरोना, प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी बूस्टर डोस फायदेशीर? तज्ज्ञांचं मत काय?


Corona : देशात पुन्हा कोरोनामुळे धोक्याची घंटा; जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये किती वाढली रुग्णांची संख्या?