Corona In India : देशात गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड संसर्गाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहेत. आज एकाच दिवसात कोरोनाचे 2593 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा सलग दुसरा दिवस आहे, जेव्हा कोविडचे 2500 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यामुळे आतापर्यंत देशातील रुग्णांची संख्या 15,873 वर पोहोचली आहे. कोविडचा वाढता धोका पाहता सरकारही सतर्क झाले आहे. दरम्यान, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. याशिवाय सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोरामला अलर्टवर ठेवले आहे. कारण या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज सुमारे 2000 नवीन प्रकरणे समोर येत आहेत, ज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या आगमनाची जोरदार चिन्हे दिसत आहेत.


राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने फैलाव
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.04% आहे. तर तेथे कोविडमधून बरे होण्याचा आरोग्य दर 98.75 टक्के आहे. या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत 794 ची वाढ झाली आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे.


जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये किती वाढली रुग्णांची संख्या?


दिल्ली- पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, दिल्लीत कोरोनाचा वेग वाढत आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रविवारी दिल्लीत कोरोना संसर्गाची 1,083 प्रकरणे समोर आली आहेत. 10 फेब्रुवारीनंतर कोरोना प्रकरणांमध्ये ही सर्वात मोठी वाढ झाली आहे. इतकेच नाही तर गेल्या 24 तासांत एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत 18,74,876 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 26,168 लोकांचा मृत्यू झाला आहे.


उत्तर प्रदेश- रविवारी यूपीमध्ये 213 नवीन रुग्ण आढळले आहेत. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबाद येथून सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या 24 तासांत नोएडामध्ये 98 रुग्ण आढळले आहेत, तर गाझियाबादमध्ये 56 जणांच्या तपासणी अहवालात कोरोनाची पुष्टी झाली आहे. त्याचप्रमाणे आग्रामध्ये 15, लखनऊमध्ये 10, मेरठमध्ये 8, वाराणसीमध्ये 3, ललितपूरमध्ये 4, महाराजगंजमध्ये 3, बुलंदशहर-गोरखपूरमध्ये 2-2 प्रकरणे आढळून आली आहेत. अलीगढ-मथुरा-सहारनपूरमध्येही 2-2 संक्रमित आढळले आहेत. तर बाराबंकीमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  अलीगढ-मथुरा-सहारनपूरमध्येही 2-2 संक्रमित आढळले आहेत. तर बाराबंकीमध्ये दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1199 वर पोहोचली आहे. 133 लोक बरे झाले आहेत.


हिमाचल प्रदेश- येथे शनिवारी 1150 लोकांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी 75 लोक पॉझिटिव्ह आढळले. रविवारी 385 जणांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी 74 जण पॉझिटिव्ह आढळले. इतर राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहून राज्य सरकारने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला सतर्क केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात दररोज ५०० हून अधिक नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :