Corona Cases In India : देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2,483 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सोमवारी दिवसभरात 1,970 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 636 वर पोहोचली आहे. 


दरम्यान, दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाचे एमडी डॉ. सुरेश कुमार यांनी सोमवारी सांगितलं की, "कोविड लसीचा बूस्टर डोस शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांनी प्रत्येकाला बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं. बूस्टर डोस प्रत्येकाला महामारीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करेल, असंही त्यांनी सांगितलं. 


ANI वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. कुमार म्हणाले की, "कोरोना लसीच्या बूस्टर डोसचा देशातील वाढत्या रुग्णांवर मोठा परिणाम होईल. ते म्हणाले की, देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस मोफत उपलब्ध आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला बूस्टर डोस घ्यायला हवा. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल."



लसीकरणानंतर रुग्णांच्या संख्येत घट


ते पुढे बोलताना म्हणाले की, "कोरोना लसीच्या दोन डोसनंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतांश लोक असे आहेत, ज्यांचे लसीकरण अपूर्ण आहे. अशातच कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस कुटुंब आणि समाजाच्या संरक्षणासाठी घेणं महत्त्वाचं आहे."


4-5 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ


बूस्टर डोसबद्दल बोलण्याबरोबरच, गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरही डॉ. कुमार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "गेल्या 4-5 दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी दर 4-5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे." 


महत्त्वाच्या इतर बातम्या :