Ajit Pawar On Gautami Patil : गौतमी पाटील  (Gautami patil) म्हणजे चर्चा तर होणारच...पण यावेळी गौतमी  चर्चेत आलीय ती बैलासमोर केलेल्या डान्समुळे. गौतमी पाटीलचा बैलासमोरचा डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.  दरम्यान गौतमीनं बैलासमोर केलेल्या नृत्यावर  अजित पवारांना (Ajit pawar) प्रश्न विचारण्यात आला त्यावर  त्यांनी  "तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय", अशा शब्दांत मिश्किल टिपण्णी केली आहे.  मुळशीतील एका नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे  आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून तिथं बैल बांधला होता


पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात  बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी लचकत, मुरडत नाचताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर गौतमीबाबत सोशल मीडियावर चर्चा देखील रंगू लागली. गावाखेड्यातील एकही कार्यक्रम किंवा जत्रा गौतमी पाटीलशिवाय पार पडत नसल्याचं सध्याचं चित्र आहे. लहान मुलाच्या वाढदिवसापासून तर गावातील पारंपारिक जत्रेपर्यंत सध्या सगळीकडेच गौतमी पाटील चांगलीच गाजताना दिसत आहे. राजकारणी लोकंही तिच्यावर प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहे. 


...तिचं ते कामच आहे!


यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कार्यक्रम करणं हाच गौतमी पाटीलचा व्यवसाय आणि उपजीविकेचं साधन आहे. ती बैलासमोर नाचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. बैल काय ती गायीसमोर नाचू द्या. तिचा तो अधिकार आहे. लहानमुलाच्या वाढदिवसाला बोलवल्यावर तिला नाचावच लागतं आणि शर्यतील किंवा बैळपोळ्याला बोलावलं तरीही तिला नाचावच लागतं. तिचं ते काम आहे आणि तिने ते करावं, असंदेखील ते म्हणाले. 


 सुपारी परवडत असेल तर बोलवा!


बाजार समितिच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अजित पवार बारामतीला गेले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की सध्या जत्रांचे दिवस सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जत्रा सुरु आहे. त्यामुळे काही गावात  तमाशे बोलावले जातात. अनेक लोक तामाशांना गर्दी देखील करतात. त्यातच आता महाराष्ट्रभर गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे मतदान करा आणि रात्री पाटलीनबाईंना आणा असं मी गंमतीत सुचवलं होतं. तिच्या कार्यक्रमासाठी लागणारी सुपारी परवडत असेल तर नक्कीच तिला बोलवावं असं ते म्हणाले. 


महिलांच्या हाती सुरक्षा...


गौतमी पाटीलचा एकही कार्यक्रम राड्याशिवाय होत नाही, हे चित्र मागील काही दिवसांपासून कायम आहे. आतापर्यंत झालेल्या तिच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा, हाणामारी आणि तोडफोड झाल्याचं पाहिलं आहे. मात्र मुळशीतील एका कार्यक्रमात गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाची सुरक्षा महिलांच्या हाती देण्यात आली होती. महिलांनी हाती काठ्या घेऊन सुरक्षा केली होती.