Pune Crime News : पुण्यात (Pune) बंटी-बबली जोडीने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. खानदेशची लोकप्रिय कलाकार दिपू क्वीन (Deepu Queen) आणि तिच्या प्रियकराने तात्काळ लोन मिळवून देतो असं सांगून नागरिकांची लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) या प्रकरणी गुन्हा दाखल करून हेमराज बावसार आणि दिपाली पौनीकर उर्फ दिपू क्वीन यांना अटक केलीय. या बंटी बबलीच्या जोडीने तब्बल दीडशे जणांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तत्काळ कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रूपये उकळले
खानदेशी गाण्यांची उत्तर महाराष्ट्रात मोठी चलती आहे. या गाण्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना उत्तर महाराष्ट्रात मोठी प्रसिध्दीही मिळते. दीपू क्वीन ही खानदेशी गाण्यांमधली प्रसिध्द कलाकार आहे. सोशल मीडीयात तिच्या व्हिडीओचा चांगलाच बोलबाला आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही ती सादर करते. पण झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी दीपू क्वीनने आणि तिचा प्रियकर हेमंत बावसार यांनी पुण्यात मानधन मायक्रो फायनान्स या नावाने ऑफिस थाटून तत्काळ कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रूपये उकळले आणि गुजरातला पळून गेले होते.
पोलीस सुरूवातीला दोघांना ओळखू शकले नाहीत
दीपू क्वीन आणि तिचा प्रियकर यांनी फसवणूक केलेल्या अनेक लोकांना स्वारगेट पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून या दोघांना शोधून अटक केलीय. गंमतीची बाब म्हणजे या दोघांचे चकचकीत व्हिडीओ बघितल्यावर प्रत्यक्षात अटक करायला गेलेले पोलीस या दोघांना सुरूवातीला ओळखू शकले नाहीत, मात्र शरीरसाधर्म्य लक्षात येऊन त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
खानदेशी स्टारला चांगलाच झटका
खानदेशी स्टार असलेल्या दीपू क्वीनला पोलिसांनी चांगलाच झटका दिलाय. गुजरातला पळून गेल्यावर एका झोपडपट्टीत हे दोघे राहत होते. त्यामुळे आभासी दुनियेचे कलाकार प्रत्यक्षात मात्र भुरटे बंटी बबली निघाले आहेत.
सांगलीतही अशाच बंटी-बबलीला अटक
सांगलीमध्ये सहा जणांना एका दाम्पत्याने 10 हजाराने कमी सोने मिळेल असे सांगून या बंटी-बबली जोडीने काही लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले होते.कमी दरात सोने देतो आणि झटपट नफा मिळवण्याची एक स्कीम आहे, असे सांगत विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे असे फसवणूक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांनी तब्बल 52 लाख 90 हजाराचा गंडा घातला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Uttarakhand : भाजप नेत्याच्या मुलाला अटक; महिला कर्मचाऱ्याची हत्या, पोलीसांची गाडी अडवून संतप्त महिलांची आरोपींना मारहाण
Todays Headline 24th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या