बारामती, पुणे : चंंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, अशा शेलक्या शब्दांत शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. बावनकुळे यांनी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन विरोधकांना नाक घासून माफी मागा, असा हल्लाबोल केला होता. शिवाय ते बारामती 51 टक्के जिंकून येऊ, असं कायम म्हणत असतात. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेली मुदत संपायला दोन दिवस आहे. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष आहे. सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये संवाद झाल्याची शक्यता आहेय त्यांनी जर चांगला निर्णय घेतला तर आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे.