Pune Water Tanker : पुणे (Pune) विभागातील 54 गावे आणि 342 वाड्यांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावांमध्ये एकूण एक लाख 23 हजार 476 लोकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यात पुणे, सांगली (sangli) आणि सातारा  (satara) या तीन जिल्ह्यांतील गावांचा समावेश आहे.कायमस्वरूपी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर आणि बागायती क्षेत्र असलेल्या कोल्हापूरला आतापर्यंत एकही टँकर आलेला नाही. त्यामुळे हे जिल्हे आता टँकरमुक्त म्हणून ओळखले जात आहेत.


सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 54 टँकर सुरू असून त्याद्वारे 36 गावे आणि 253 शेततळ्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांची जिल्ह्याची लोकसंख्या मोठी आहे. 


सध्या विभागातील 12 तालुक्यांतील गरजू गावांना 25 शासकीय व 45 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे 1,869 पशुधनांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 72 खाजगी विहिरी आणि बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.


पुण्यात सहा तालुके टँकरमुक्त आहेत
या उन्हाळ्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकही टँकर सुरू झालेला नाही. त्यामुळे हे तालुके आता टँकरमुक्त तालुके म्हणून ओळखले जात आहेत.महत्वाचं म्हणजे या तालुक्यांमध्ये इंदापूर आणि दौंड या दोन तालुक्यांचा समावेश आहे जिथे पूर्वी टँकरचा वापर केला जात होता. तसेच हवेली, मावळ, मुळशी व वेल्हे तालुके टँकरमुक्त झाले आहेत.


या तालुक्यांमध्ये सुरू झाले
जिल्हातील काही तालुक्यांना अजुनही पाण्याची समस्या जाणवते आहे. त्यात आंबेगाव, बारामती, भोर, जुन्नर, खेड, पुरंदर, शिरूर आणि शहरालासुद्धा ट्रँकरची गरज भासत आहे. त्यासोबतच माण, वाई, सातारा, कराडसोबत सर्व साता जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. 


अनेक जिल्ह्यांचा देखील समावेश
पुणे, सातार, सांगली सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात मराठवाडा,विदर्भासह खान्देशचाही समावेश आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठीची फरपड न संपणारी आहे.