Burud Ali Pune : बांबुच्या कलाकृती; जुनी परंपरा आणि नवी फॅशन जपणारी पुण्यातील 'बुरुड आळी'
पुण्यात खास बांबूच्या विविध कलाकृती विक्रीसाठी मोठी बाजरपेठ आहे. त्या बाजारपेठेत बांबूपासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या सुबक वस्तू विक्रीला असतात. बुरुड आळी असं या बाराजपेठेचं नाव आहे.
Burud Ali Pune : पुण्यात पारंपारिक व्यावसाय करणारे (Pune bamboo market) अनेक लोक राहतात. 18 व्या शतकापासून पुण्यात वेगवगेवळ्या वस्तुंच्या खरेदीसाठी (Burud ali) खास बाजारपेठा आहे. त्यात तांबट आळी, तुळशीबाग, लक्ष्मी रोड, नाना पेठ, रास्ता पेठ, रविवार पेठ अशा अनेक बाजारपेठा खास वस्तुंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तांब्यांच्या वस्तू किंवा जुनी, नवीन भांडी हवी असल्यास तांबट आळीत ते सहज मिळेल. त्याचप्रमाणे पुण्यात खास बांबूच्या विविध कलाकृती विक्रीसाठी मोठी बाजरपेठ आहे. त्या बाजारपेठेत बांबूपासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या सुबक वस्तू विक्रीला असतात. बुरुड आळी असं या बाराजपेठेचं नाव आहे.
पुण्यातील गणेशपेठेजवळ ही बुरुड आळी आहे. मूळतः 18 व्या शतकात स्थापन झालेले हे मार्केट शहरातील बांबुच्या कलाकृतींसाठी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. या आळीत शिरताच बांबुच्या विविध कलाकृती बघायला मिळतात. या आळीत दुकानदार आणि बहुतेक कारागीर हे सातारा, अहमदनगर आणि कर्नाटकातील स्थलांतरित आहेत जे 18 व्या शतकात पुण्यात स्थायिक झाले.
बुरुड आळीचे कारागीर राजेश पवार म्हणतात, आम्ही लहान होतो तेव्हा शाळेतून परत आल्यानंतर आम्ही विळा घेऊन बसायचो आणि मध्यभागी बांबुचे तुकडे करायचो. मग आम्ही त्यातून जाळ्या आणि झाडू बनवायचो." या बांबू तयार समाजाकडे समृद्ध हस्तकलेचा आणि इतिहासाचा वारसा असताना या पिढीतील मुले हा व्यवसाय करतील की नाही याची खात्री नाही. ते म्हणतात की, त्यांच्या मुलांना विणकामाचे कौशल्य शिकवण्यात त्यांना खूप आनंद होईल पण त्यांच्यावर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही.
जुनी परंपरा आणि नवी फॅशन
सध्या बाजारात नवनव्या डेकोरेशनच्या वस्तू उपलब्ध आहेत. प्लास्टिकच्या वस्तुंपासून ते काचेच्या वस्तुंपर्यंत अनेक प्रकारच्या सुंदर आणि सुबक डेकोरेशनच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहे. त्यात 100 रुपयांपासून तर लाख रुपयांपर्यंत अनेक वस्तू बाजारात विकायला आहेत. मात्र या सगळ्यातदेखील बांबुच्या विविध कलाकृती घेण्यासाठी नागरिक या बुरुड आळीत गर्दी करतात. या बाजारात मिळणाऱ्या विविध वस्तू अजुनही अनेकांना आकर्षित करतात. टोपल्या, कंदिल आणि विविध प्रकारच्या कलाकृती विक्रीसाठी असतात. त्यात पारंपारिक कंदिल टोपल्या तर मिळतातच मात्र अलीकडे फॅशनेबल नाईट लॅम्पही वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. सोबत बांबूंची खेळणीदेखील अनेकांना आकर्षित करतात. त्यामुळेच जुनी परंपरा जपताना नव्या फॅशनचा ट्रेन्डही या बाजारात बघायला मिळते.