Pune News :   जय वीरू म्हणून (Pune News) ओळखल्या जाणाऱ्या मित्रांचा एकाच दिवशी काही तासाच्या अंतराने मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका मित्राचा सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समजताच सायंकाळी दुसऱ्या मित्राचा (Friend) ही हृदयविकाराच्या (heart attack)  झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यात घडली आहे. त्यांच्या यारी दोस्तीचा दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यात काम करणारे रामचंद्र किसन कोरडे आणि त्यांचे जिवलग मित्र अशोक गणपत होळकर या दोघांचे हृदयविकाराने निधन झाले. कारखान्यात जय-विरु या नावाने प्रसिद्ध असलेली कोरडे-होळकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबालादेखील या घटनेमुळे चांगलाच धक्का बसला आहे. 


रामचंद्र कोरडे (वय 49) यांचे हृदयविकाराने निधन झाले. तर त्यांचे जिवलग मित्र अशोक होळकर यांचे त्याच दिवशी सायंकाळी हृदयविकारानेच निधन झाले आहे. रामचंद्र कोरडे हे बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथून सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते तर अशोक होळकर हे बारामती तालुक्यातील होळ (पाटीलवाडा) येथून कारखान्यात कामाला येत होते. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचा फरक होता. त्यांची जिगरी मैत्री सगळीकडे परिचित होती. 


दम्यान, दोघेही सोमेश्वर कारखान्यात एकाच दिवशी म्हणजे 19 ऑक्टोबर 2001 रोजी असिस्टंट फायरमन या पदावर रुजू झाले. त्यामुळे एकत्र काम, एकत्र जेवण, फिरायला एकत्र जाणे, सुख दुःखात एकाच वेळी सामील होणे. यामुळे त्यांची मैत्री घट्ट होत गेली. यांची मैत्री देवाला देखील आवडली असल्याने त्यांना एकाच वेळी आपल्याकडे बोलावून घेतल्याची चर्चा नागरिक करत आहेत. मित्रत्वाची नाळ नियतीने अपघातानंतरही तुटू दिली नाही.  जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी हा नारा त्यांच्यावर चांगला लागू झाला. जय-वीरु अशी ओळख असलेल्या या दोघांच्या यारी दोस्तीचा दुर्दैवी अंत झाला आहे. 


गाव हळहळलं...


या दोघांच्या अचानक एक्झिटमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांची मैत्री गावाला आणि कारखान्यातील इतरांना चांगलीच माहित होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांवर आणि कारखान्यातील सहकार्यांवर शोककळा पसरली आहे. जय-वीरु अशी ओळख असलेल्या या दोघांच्या यारी दोस्तीचा दुर्दैवी अंत झाला आहे. 

संबंधित बातमी-


kharghar heat stroke : खारघर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जण सात तासांपासून होते उपाशी, पोस्ट मॉर्टम अहवालातून धक्कादायक बाब उघड