एक्स्प्लोर

Kasba By Election : अखेर मनसेचं ठरलं! पुण्यातील कसबा पोट निवडणुकीत भाजपला साथ 

Kasba By Election : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba By Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena ) भाजपला (bjp) पाठींबा दिला आहे.

Kasba By Election : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kasba By Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena ) भाजपला (bjp) पाठींबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी याबाबतची भूमीका जाहीर केल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली. "हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्यामुळेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले असल्याचे वागस्कर यांनी सांगितले. 

पुण्यातील मनसे नेत्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बाबू वागस्कर, अजय मोरे, किशोर शिंदे आदी मनसेचे पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते. 

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि मित्र पक्षाच्या युतीतर्फे हेमंत रासने हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या संदर्भात मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक नेत्यांनी राज यांची आज भेट घेतली. हिंदुत्व आणि विकास याच्या बाजूनेच आपला कल असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.  

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे प्रदेश, नेते बाबू वागस्कर, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कसबा विभागाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली. यावेळी वागस्कर यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.   

दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही कसब्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे कसब्यातून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र ती उमेदवारी भाजपच्या हेमंत रासने यांना देण्यात आली. तर महाविकास आघाडीकहून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उदेवारी देण्यात आली. त्यामुळे आता हेमंत रासने विरूद्ध रविंद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे.  

महत्वाच्या बातम्या

Pune Bypoll Election : कसब्यात महाविकास आघाडीला दिलासा, मात्र भाजपचं टेन्शन वाढण्याचं कारण काय?

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ram Kadam on Raj Thackeray: राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'
राज ठाकरेंनी मिसिंग लिंकवरुन देवेंद्र फडणवीसांना फटकारताच राम कदमांचा पलटवार, म्हणाले, 'हिंदीत बोललं तर काय झालं?'
Moshi Building Collapse: 'काहीतरी चमत्कार घडेल अन् माझा भाऊ जिवंत असेल'; मोशी दुर्घटनेत अडकलेल्या महेशच्या भावाचा काळीज चिरणारा आक्रोश
'काहीतरी चमत्कार घडेल अन् माझा भाऊ जिवंत असेल'; मोशी दुर्घटनेत अडकलेल्या महेशच्या भावाचा काळीज चिरणारा आक्रोश
Moshi Building Collapse: 'आत कचऱ्याची प्रचंड उष्णता, विषारी वायू अन्...'; मोशीत जवानांनी जीव धोक्यात घालून कसं केलं बचावकार्य? अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
'आत कचऱ्याची प्रचंड उष्णता, विषारी वायू अन्...'; मोशीत जवानांनी जीव धोक्यात घालून कसं केलं बचावकार्य? अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Embed widget