Maharshtra Kesari: महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari)  स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात (Pune) रंगणार आहे. यंदा या स्पर्धेचे 65 वे वर्षे आहे. सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. 33 जिल्ह्यातील आणि 11 महापालिकामधील 45 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहे. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत.


पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तर समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan singh) आदी उपस्थित राहणार आहेत. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होणार आहे. 900 कुस्तीगीर, 90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 


अखेर वादाला पूर्णविराम


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra Kustigir Parishad)  काही दिवसांपूर्वी भारतीय कुस्ती संघाकडून बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस (BJP Ramdas Tadas) यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. मात्र बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landge)  यांनी या बरखास्तीला न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने (Court) देखील बरखास्तीला स्थगिती दिली आणि त्यानंतर या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपणच भरवणार, असा दावाही दोन्ही बाजूंकडून करण्यात आला होता. बाळासाहेब लांडगे यांनी डिसेंबर महिन्यात अहमदनगरमधे तर रामदास तडस गटाकडून जानेवारीत महिन्यात पुण्यात ही स्पर्धा होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे नक्की कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचं यावरुन पैलवानांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांनी अखेर तोडगा काढला. आता परिषदेच्या सचिवपदाचा बाबासाहेब लांडगे यांनी राजीनामा दिला असून नवी कार्यकारिणी नेमण्यात आली आहे. आता 11 ते 14 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे. 


संबंधित बातम्या:


Vasant More on Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण