Kalyani Deshpande Pune : पुण्यातील (Pune) सर्वात कुख्यात सेक्स रॅकेटर कल्याणी उर्फ ​​जयश्री उर्फ ​​टीना उमेश देशपांडे (52) हिला पुण्यातील विशेष न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) च्या कलमांखाली आरोपीला दोषी ठरवण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण आहे. कोण आहे ही  कल्याणी देशपांडे? (Kalyani Deshpande)



....आणि कल्याणी पुण्यातील टॉप 'दलाल' बनली.
कल्याणी ही सुमारे 90 च्या दशकापासून पुण्यातील देह व्यापाराचा भाग होती, पण वर्ष 2000 मध्ये तिचे नाव पुणे पोलिसांच्या नोंदीमध्ये आले. सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेली कल्याणी पुण्यातील टॉप 'दलाल' बनली. तिच्यावर सुमारे 24 गुन्हे दाखल आहेत. रिपोर्ट्सनुसार, कल्याणीचे नेटवर्क अजय पाटील, शक्ती थापा, मंगेश रुद्राक्ष आणि राजू बंगाली यांसारख्या गुन्हेगारांपेक्षा खूप मोठे असल्याचे मानले जाते. तिच्या बंगल्यातून 'व्हीनस एस्कॉर्ट्स' नावाची एस्कॉर्ट एजन्सी चालवली जात होती. कल्याणीचा बंगला वेश्याव्यवसाय आणि गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध होता. 


वेश्याव्यवसायासाठी देश-विदेशातील मुलींचा गैरवापर
डिसेंबर 2007 मध्ये त्यांचे जवळचे सहकारी अनिल ढोले यांची याच बंगल्यात हत्या करण्यात आली होती. मुंबईतून वेश्याव्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी ढोले हा एजंट म्हणून काम करत असे. ढोलेच्या मृत्यूनंतर कल्याणीच्या कारवाया वाढल्या. तिने पुणे आणि इतर भागात वेश्याव्यवसायासाठी देश-विदेशातील मुलीं पुरवल्याचा केल्याचा आरोप आहे. कल्याणीने हॉटेलवाले आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेट यांच्यात दलाली करत मजबूत नेटवर्क निर्माण केल्याचा आरोप आहे. तिच्याकडे खूप मोठा क्लायंट बेस होता. ज्यात काही हाय-प्रोफाइल ग्राहकांचा समावेश होता. यापूर्वीही कल्याणीला अनेकवेळा अटक करण्यात आली होती. तिच्यावर मुंबईतही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
डिसेंबर 2005 मध्ये पुण्याच्या बाहेरील एका हॉटेलमध्ये एका सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी कल्याणीवर प्रथमच मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता, परंतु तिला नंतर निर्दोष सोडण्यात आले. 31 मार्च 2012 रोजी पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी कल्याणीला वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक केली. एप्रिलमध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) हिंजवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब सुर्वे आणि हवालदार मोहम्मद हनिफ अब्बास शेख यांना कल्याणीचा चुलत भाऊ जतिन चावडा यांच्याकडून 40,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात कल्याणी जामिनावर बाहेर पडण्यात यशस्वी झाली. प्रत्येक वेळी जामिनावर सुटल्यावर कल्याणीने तिचे सेक्स रॅकेट पोलिसांच्या नाकावर टिच्चून चालवले होते. 


कल्याणीच्या जीवनावर आधारित चित्रपट?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीने तिच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई आणि अहमदाबाद येथे होत असल्याचा दावाही तिने केला होता. मात्र या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून कल्याणीला पोलिसांकडून तिचे शोषण आणि तिला वेश्याव्यवसायात कसे भाग पाडले गेले हे जगाला सांगायचे होते, असे तिने सांगितले होते. कल्याणीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ती एका सामान्य कुटुंबातील आहे आणि तिचे लग्न एका ऑटोचालकाशी झाले आहे. तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या कुटुंबासाठी पैशाची तातडीची गरज असल्याने तिला सेक्स रॅकेटमध्ये ओढले होते. मात्र, जुलै 2016 मध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकल्यानंतर कल्याणी बिथरली. पुण्यातील भुसारी कॉलनी अपार्टमेंटमध्ये गुन्हे शाखेने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. कोथरूड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी सुरुवातीला कल्याणीचे सहकारी प्रदीप गवळी आणि रवी तापसी यांना अटक केली. त्याला ऑगस्टमध्ये कठोर कलमांतर्गत अटक करण्यात आली होती.",
   
महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण
अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) च्या कलमांखाली आरोपीला दोषी ठरवण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण आहे. पुण्यातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणाऱ्या आणि संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडेसह दोघांना विशेष न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आहे. ही रक्कम न भरल्यास 1 वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे. अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे