पुणे :  शिरुर लोकसभा मतदार संघासाठी (shirur Loksabha election) प्राचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. येत्या 13 मेला मतदान पार पडणार आहेत. आज शिरुर मतदारसंघासाठी सांगता सभा सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज चाकणमध्ये भर पावसात सांगता सभा घेतली आहे. अमोल कोल्हेंना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन आणि खासदार करुन मोठी चूक केली, अशी खंत अजित पवारांनी भर पावसात घेतलेल्या सांगता सभेत बोलून दाखवली. त्यासोबत अमोल कोल्हेंवर शाब्दिक फटकेबाजीदेखील केली. यावेळी चाकणकरांनी मात्र अजित पवारांची सभा भर पावसात ऐकली. अनेकजण सभेत थेट डोक्यावर खुर्च्या घेत अजित पवारांची सभा ऐकताना दिसले. 


अजित पवार म्हणाले की, मागील पाच वर्षांपूर्वी या अजित पवारांनी मोठी चूक केली. डॉक्टर अमोल कोल्हेंना माझ्या मुंबईच्या घरी बोलवून त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर आणि खासदार म्हणून निवडणून आल्यानंतर पाच वर्षासाठी माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे करतील. मी चुकलो, मी अपयशी ठरलो, मला ती चूक मान्य आहे. आता चूक सुधारण्याची वेळ आली आहे. आढळराव पाटलांना निवडून आणा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. 


अमोल कोल्हेंनी पाच वर्षात कोणतीही कामं केली नाहीत. विकास कामांकडे लक्ष दिलं नाही. येत्या पाच वर्षात मी सगळे कामं पूर्ण करेन आणि विकास करुन दाखवेन. मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं. त्यासोबतच कांद्याचा प्रश्नासंदर्भातदेखील सगळ्या महत्वाच्या नेत्यांशी बोलणार आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, अशीही ग्वाही अजित पवारांनी चाकणकरांना दिली. 


'मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आम्हाला पावसात काम करण्याची सवय आहे. चाकणकरांनो आपण शेतकऱ्यांची औलाद आहोत. आपण पावसात भिजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पावासाचा आपल्या कामावर फरक पडत नाही, असं म्हणज अजित पवारांनी भर पावसात चाकणकरांना संबोधित केलं. आपल्याला मोठ्या मताधिक्यानं आढळराव पाटलांना निवडून आणायचं आहे. विकासासाठी त्यांना मतदान करा', असं आवाहनदेखील त्यांनी चाकणकरांना केलं. 


इतर महत्वाची बातमी-