चाकण, पुणे : जवाहर नेहरू इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले. त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत.  मात्र त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी करत आहेत, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला. त्यासोबतच हा देश लोकशाही देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहत आहेत, अशी घणाघाती टीकाही शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या चाकण येथील सभेत केली. यावेळी व्यवस्थेला बेधडक आव्हान देणारे अमोल कोल्हे संसदेत हवेतच असं शरद म्हणाले. 


                                    
शरद पवार म्हणाले, येणाऱ्या सरकारकडे जगाचे लक्ष आहे. हा देश लोकशाही असलेला देश आहे. लोकशाहीवर मोदी आणि त्यांचे सहकारी संकट आणू  पाहत आहेत. त्यांना घटना आणि संविधान बदलायचे आहे. यावेळी टीका व्हायला लागली त्यावेळी मोदी सांगू लागले आम्ही घटनेला हात लावणार नाही. घटना बदल्याण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. त्यासाठी 400 खासदार निवडून द्या. याचा अर्थ हा असा आहे कि तुमच्या आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव त्यांनी तयार केला आहे. त्यापासून आपण सावध भूमिका घेतली नाही तर हिंदुस्थानची लोकशाही धोक्यात जाण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली.  


जवाहर नेहरू इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले. त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत.  मात्र त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी करीत आहेत. मोदी राज्यात येतात आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर मोदी टीका करतात मात्र आमच्या अंगाला टीकेमुळे भोके पडणार नाहीत. ते या ठिकाणी नाही त्या गोष्टी सांगतात, असाही हल्लाबोल शरद पवारांनी केलाय.


नव्या पिढीचा नेता राहुल गांधी पायी सर्व देशात फिरला. लोकांशी संवाद साधला, त्यांची दुःख समजून घेतली; त्यांची मोदी टिंगल करत आहेत. पंडित नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांनी देशासाठी त्याग केला मात्र त्याची  नोंद घेणे सोडा तर त्यांच्या बाबत वेडेवाकडे बोलले जात आहे. शेतमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे, प्रत्येकाला काम मिळाले पाहिजे स्रियांचा सन्मान झाला पाहिजे त्यासाठी संसदेत कोल्हे यांच्या सारखे नेतृत्व जायला हवे, असंही पवार यांनी म्हटलं आहे.


इतर महत्वाची बातमी-


Maharashtra Weather Update :  पुणे, साताऱ्यात ऑरेंज अलर्ट; पुढील चार दिवस राज्यातलं हवामान कसं असेल?