प्रेमासाठी वाट्टेल ते...! प्रेयसीचे लाड पुरवणे महागात पडले
आकाश हा एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे. चार महिन्यांपूर्वी त्याची एका मुलीशी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेयसीला खूश करण्यासाठी आणि तिचे लाड पुरविण्यासाठी आकाशने आपल्या फोटोग्राफीच्या व्यवसायाचा फायदा घेतला.

पुणे : प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन ते गहाण ठेऊन पैसे मिळवणाऱ्या फोटोग्राफर प्रियकराला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल 29 लाख रुपये किमतीचे 10 महागडे कॅमेरे पोलिसांनी जप्त केले आहेत. आकाश पांडुरंग भिसे (वय 22, रा.मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. फरासखाना पोलीस स्टेशनचे एक पथक लक्ष्मी रोड परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक तरूण महागडा कॅमेरा घेऊन थांबलेला दिसल्याने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांना यावेळी त्याच्याकडे महागडा कॅमेरा आढळला. त्याविषयी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो कॅमेरा चोरीचा असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी करत त्याच्याकडून तब्बल 26 लाख 60 हजार रूपये किंमतीचे कॅनन कंपनीचे 10 कॅमेरे आणि 8 लेन्स जप्त केल्या. आरोपी आकाश हा एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे. चार महिन्यांपूर्वी त्याची एका मुलीशी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेयसीला खूश करण्यासाठी आणि तिचे लाड पुरविण्यासाठी आकाशने आपल्या फोटोग्राफीच्या व्यवसायाचा फायदा घेतला. त्याने शहरातील वेगवेगळ्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन त्याला फोटोग्राफीच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या असून त्यासाठी कॅमेरा भाड्याने पाहिजे असे सांगितले. प्रत्येक दिवसाला दीड हजार रूपये याप्रमाणे महागडे कॅमेरे भाड्याने घेतले. नंतर हेच कॅमेरे त्याने गहाण ठेवले आणि मिळालेल्या पैशांमधून प्रेयसीला अॅक्टीव्हा गाडी, सोन्याच्या अंगठ्या, चैन घेऊन दिल्या. एवढेच नाही तर तो प्रेयसीला तसेच मित्रांना महागड्या हॉटेलमध्ये देखील घेऊन जायचा. अशाप्रकारे मौजमजेसाठी त्यांनी लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फरासखाना पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















