पुणे : उद्धव ठाकरेंनी पहिल्या उमेदवाराची घोषणा केलीये. मावळ लोकसभेतून (Maval Loksabha)  महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरेंना (Sanjog Waghere) उतरवलं आहे. त्यानंतर वाघेरेंनी घरोघरी जाऊन प्रचाराची सुरुवात केलीये. शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना विरोधक म्हणून गृहीत न धरणाऱ्या वाघेरेंनी भाजपसोबत लढण्याची तयारी दर्शवली आहे.


महाविकास आघाडीत अद्यापिक जागांचा तिढा सुटला नसला असलं तरी उद्धव ठाकरेंनी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. मावळमधून संजोग वाघेरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी घोषणा करताच मावळ लोकसभेतून ते महायुतीच्या विरोधात रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांच्याकडून प्रचाराचीदेखील सुरुवात झाली आहे. 


वाघेरे कोणत्या मुद्यांवर निवडणूक लढवणार?


संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात उतरताना विविध मुद्दे मांडणार आहेत. त्यात शिक्षण, कामगार, शेतकरी, विकास या सगळ्यांमुद्यांवर ते निवडणूक लढवणार आहेत. महायुतीत ती मोठे पक्ष आहेत. मात्र भाजपच्या विरोधात लढण्याची आम्ही तयारी केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मावळमध्ये महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जाणार यासंदर्भात अजून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही आहे. मात्र शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. तरीही ही मावळमधील जागा भाजपला सोडली जाणार, असल्याचा दावा वाघेरे यांनी केला आहे. 


10 वर्षात कोणताही विकास नाही!


वाघेरे पुढे बोलताना म्हणाले की, मागील 10 वर्षात मावळ लोकसभेतील परिसरात कोणताही विकास झाला नाही. मावळ मतदार संघाची भौगोलिक रचना पाहिली तर हा मतदारसंघ पर्यटनासाठीदेखील उत्तम आहे आणि इंडस्ट्री भागदेखील आहे. या परिसरातील पर्यटनाचा विकास व्हायला हवा होता. त्यातच कामगारांचे अनेक विषय आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांच्यादेखील अनेक समस्या आहेत. त्याकडे मागील 10 वर्ष दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. याच मुद्यांवर मी काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


संजोग वाघेरे कोण आहेत?



  • माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पुत्र आहेत. 

  • संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेत

  • महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिलाय

  • त्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या

  • स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले आहे

  • संजोग वाघेरे राष्ट्रवादी चे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेत

  • शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं


इतर महत्वाची बातमी-


-Pune Weather Update : पुणेकरांना उन्हापासून दिलासा; पुण्यात 13 अंश सेल्सिअस तापमान; गारठा वाढण्याची शक्यता


-Pune News : 24 तास उलटले तरी बिबट्या सापडेना; कात्रजमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्राणीसंग्रहालय आजही बंद