एक्स्प्लोर

19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य

पुणे: पुण्यातली कचराकोंडी 19व्या दिवशीही कायम आहे. परदेश दौऱ्यावरुन परतलेल्या आयुक्त कुणालकुमार यांनी फुरसुंगीतल्या कचरा डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवादही साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे ढिग जमा झाले आहेत. यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही बिकट होत चालला आहे.   काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?  पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.  इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो. त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 18 दिवस केल्यास, 20 हजार टन कचरा पुणे शहरात पडून आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दोन वर्षापूर्वी आश्वासन  पुणे आणि फुरसुंगी कचऱ्याचा प्रश्न हा आज-कालचा नाही. दोन वर्षापूर्वीही हा प्रश्न पेटला होता. फुरसुंगीकरांनी पुण्याचा कचरा टाकू न देण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, त्यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन गावकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दिलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील डंपिंगसाठी पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी 31 डिसेंबर 2014 पर्यंतची मुदत मुख्यमंत्र्यांनी मागितली होती.  त्यामुळे उरळी आणि फुरसुंगी गावांनी त्यावेळी पुकारलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं.  महापौर परदेश दौऱ्यावर दरम्यान, महापौर मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित परिषदेसाठी आठ दिवस मेक्सिको दौऱ्यावर आहेत. तर पालकमंत्री गिरीष बापट हे 2 मे ते 11 मेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न नेमका कसा निकाली निघणार याकडे पुणेकरांचे डोळे लागून राहिले आहेत. संबंधित बातम्या: आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट पुण्याचा 'कचरा', सांस्कृतिक राजधानीची 'कोंडी'

17 दिवसांपासून पुण्यातील कचराकोंडी कायम, नेते परदेश वारीवर

 

महत्त्वाच्या बातम्या

अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं, पुरुषोत्तम जगतापांबाबत काय म्हणाले जय पवार?
शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं, पुरुषोत्तम जगतापांबाबत काय म्हणाले जय पवार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget