पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पोलीसांना गुंगारा देत अनेक  (Sasoon Hospital Drug Racket) ठिकाणी फिरत होता. मात्र बंगळूरूहून चेन्नईला जात असताना त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ससून रुग्णालयाच्या गेटवर ड्रग्ज सापडलं. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली होती. त्यातील एक म्हणजे ललित पाटील. हा ललित पाटील ससूनमधील वॉर्ड नं. 16 मध्ये उपचार घेत असल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं नव्हतं. ताब्यात घेण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरु असतानाच ललितने ससूनमधून पळ काढला आणि त्यानंतर एखाद्या क्राईम वेबसीरीजला शोभेल असं ड्रग्ज रॅकेट पुढे आलं. या प्रकरणात कशी आणि कधी कारवाई करण्यात आली? पाहूयात...


ललित पाटील कशी आणि कधी कारवाई करण्यात आली?



10 डिसेंबर 2020: ललित पाटील याला ड्रग्स तस्करी केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली होती चाकण मधून अटक


जानेवारी 2021: ललित पाटीलची येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती.


30 सप्टेंबर 2023: पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं. 


1 ऑक्टोबर 2023: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटीलचे नाव समोर आलं होतं.


2 ऑक्टोबर 2023: वैद्यकीय उपचार घेत असलेला ललित ने पोलिसांच्या हातावर तुरी देत ससून रुग्णालयातून पळ काढला होता.


3 ऑक्टोबर 2023: ललित पाटीलला शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या 10 पथकाकडून शोध सुरू करण्यात आला होता.


6 ऑक्टोबर 2023: ललित पाटील आणि भाऊ भूषण पाटील नाशिक मध्ये चालवत असलेल्या एम डी ड्रग्स च्या कारखान्यावर मुंबई साकीनाका पोलिसांची धडक कारवाई केली.


10 ऑक्टोबर 2023: ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली 


16 ऑक्टोबर 2023: ललितचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे याना 20ऑक्टोबरपर्यंत न्यायलयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


18 ऑक्टोबर 2023 : ललित पाटील ला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेन्नई मधून अटक केली.


18 ऑक्टोबर 2023: अंधेरी न्यायलयाने सुनावली ललित पाटीलला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


नाशिक, पुणे आणि मुंबई पोलीस मागावर असताना ललितचा नाशकात मुक्तसंचार 


ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला कोणाचा राजकीय पाठींबा होता का? तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलनं नाशिकमधून पळ काढला. त्यानंतर इंदोरला गेला, तिथून तो सूरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. चेन्नईवरुन ललित श्रीलंकेला जाणार होता, अशी माहिती मिळत आहे.


इतर महत्वाची बातमी-


Lalit patil Drug Racket : कोण आहे ललित पाटील? नाशिकचा तरुण ड्रग्जच्या दुनियेत कसा आला?