पुणे ललित पाटील (Lalit Patil )  किती नाटकी आहे आणि त्याच आधारे त्यानं पुण्यातील ससून रुग्णालयात (Sasoon Hospital)  कसा प्रवेश मिळवला हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत . चाकण पोलिसांनी ड्रग तस्करी प्रकरणी 9 डिसेंबर 2020 ला ललितला  अटक केली आणि दुसऱ्या दिवशी त्याला नायल्यात हजार केलं. न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली . मात्र दोनच दिवसांनी म्हणजे 12 डिसेंबर 2020 ला ललितने एक नाटक रचलं .


पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमधील वरच्या मजल्यावरून त्याला चौकशीसाठी खालच्या मजल्यावर नेलं जात असताना त्यानं जिन्यावरून पडल्याचं नाटक केलं . या सीसीटीव्हीमध्ये तो नाटकी पद्धतीनं जिन्यावरून पडताना दिसतोय . पडल्यामुळं त्याला आधी औंधमधील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर लगेच ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं. ससून रुग्णालयाने त्याच्यावर 17 तारखेपर्यंत उपचार केले आणि त्याला पुन्हा पोलिसांकडे सोपवलं .पोलीस त्याला हिंजवडी पोलीस स्टेशनला घेऊन देखील आले . मात्र ललितने 18 डिसेंबरला पुन्हा पाय दुखल्याचं नाटक केलं आणि त्याला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


तुरुंग प्रशासन आणि  यंत्रणेला हाताशी धरून मुक्काम ससूनमध्ये हलवला


 ससूनच्या डॉक्टरांनी ललितवर आणखी  उपचार करण्याची गरज असल्याची शिफारस केल्यानं त्याचा ससूनमधील मुक्काम वाढला . पुढं याच ससूनच्या यंत्रणेला हाताशी धरून ललितने ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवायला सुरुवात केली . पोलिसांना ललितची तीन दिवस चौकशी करता अली . त्या बळावर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध मजबूत पुरावे गोळा केल्यानं तो तीन वर्षं तुरुंगातून सुटू शकला नाही. पुन्हा पुढे तुरुंग प्रशासन आणि ससूनच्या यंत्रणेला हाताशी धरून त्यांनी त्याचा मुक्काम ससूनमध्ये हलवला. 


पाहा व्हिडीओ



ससून रुग्णालयात ललित पाटीलवर एक दोन नव्हे तर सहा डॉक्टर उपचार करच होते


पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेलेल्या ललित पाटीलवर एक दोन नव्हे तर सहा डॉक्टर उपचार करत होते. मात्र सहा डॉक्टरांकडून उपचार घेण्याएवढे ललित पाटीलला आजार तर कोणते होते त्याच्यावर उपचार करणारे ते सहा डॉक्टर कोण याबाबत माहिती देण्यास ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी नकार दिलाय. तसेच इतक्या गंभीर घटनेनंतर देखील आपल्याला याबाबत संबंधित विभागाचे मंत्री, सचिव किंवा राज्य सरकारमधील कोणीही विचारणा केली नसल्याचा दावा डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केलाय. ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाऊन आठ दिवस झालेत. या आठ दिवसांत ससूनच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेत