एक्स्प्लोर

Kishor Aware : किशोर आवारे हत्या प्रकरण! बदनामी कधीही सहन करणार नाही, आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया

बदनामी करून राजकारणातून उठविण्याचा विरोधकांचा डाव आहे. अशी बदनामी कधीही सहन करणार नसल्याचं खडेबोल आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

Kishor Aware : किशोर आवारे यांच्या हत्येत आमदार सुनील शेळके यांचा हात असल्याचं किशोर यांच्या आईने तक्रारीत म्हटलं होतं त्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेत बदनामी करून राजकारणातून उठविण्याचा विरोधकांचा डाव आहे, अशी बदनामी कधीही सहन करणार नसल्याचं त्यांनी खडेबोल विरोधकांना सुनावलं आहे.

ते म्हणाले की, किशोर आवारे यांची हत्या झाली, त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. त्यानंतर आज सकाळी सुनील शेळके नॉट रीचेबल, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ अशा बातम्या प्रसार माध्यमांनी चालवल्या. किशोर आवारे यांची जी हत्या झाली, या घटनेचे आरोपी कोण? ती घटना का घडली? यामागची सत्यता काय आहे? गुन्हेगारांचा पार्श्वभूमी काय आहे? याची सखोल चौकशी पोलिसांकडून प्रामाणिकपणे सुरू आहे. मात्र या घटनेनंतर वेगळा पायंडा पाडण्याचे काम राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून कोणी करू नये. यासाठी आम्ही सामंजस्याने काम करत आहोत. किशोर आवारे यांच्यासोबत मतभेद होते, मात्र मनभेद नक्कीच नव्हते. परंतु काही मंडळी जाणीवपूर्वक या घटनेला राजकीय वळण देऊ पाहतायेत, त्यांनी कृपया तसं करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. 

कोणाच्या जीवावर उठायला, फसवण्यासाठी निवडून दिलेलं नाही!

याच प्रकरणी ते पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणात  जी सत्यता आहे ती समाजासमोर मी नक्की आणणार. काल रात्री जी फिर्याद देण्यात आली. त्यात मी, माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे सह इतर काहींनी मिळून या हत्येचा कट केला, असं फिर्यादीत नमूद आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती गेली तर त्यांची भावना तीव्र असते हे आम्ही समजून आहोत. परंतु त्यामागचे खरे सूत्रधार कोण? जाणीवपूर्वक बदनामी कोण करतो? हे समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही. या मायबाप जनतेने आयत्यावेळी पक्ष बदलला तरी 94 हजार मतांनी निवडून दिलं. कोणाच्या जीवावर उठायला, फसवण्यासाठी निवडून दिलेलं नाही. याची मला जाणीव आहे. त्यामुळं राजकारण करताना विकासाचे करावे, आरोप करताना हे तात्पुरते असावेत. 

बदनामी सहन करणार नाही: शेळके

 'कामातून मी माझी जबाबदारी दाखवत असतो. गेल्या तीन वर्षांपासून तेच करत आलोय. राजकारणापासून अलिप्त व्हायचं असेल तर आज होतो, पण अशी बदनामी कदापि सहन करणार नाही. माझी कोणतीही चौकशी लागली तरी मी पोलीस यंत्रणेला उपलब्ध असेन. सखोल चौकशीतून सर्व समोर आलंच पाहिजे. आजवर मी कोणावर हात उचलला नाही, त्यामुळं आम्ही कोणाच्या जीवावर बेतणारे राजकारण कदापि करणार नाही. हे आमच्याकडून कधीच शक्य नाही. कारण आम्ही सुद्धा हे भोगलेलं आहे. आमच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यावर, त्या कुटुंबर काय परिस्थिती येते. हे आम्ही जाणून आहोत. त्यामुळं एखाद्याच्या जीवावर उठण्याऐवजी मी घरी बसेन. मात्र जाणीवपूर्वक बदनामी करू नये. माझा भाऊ कष्ट करतो, मेहनत घेऊन मला आर्थिक पाठबळ देतो. त्याचं नाव घेऊन त्याला कोणी बदनाम केलं, तर मी जशास तसं उत्तर द्यायला तयार आहे, असं त्यांनी खडसावून सांगितलं. 

गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी; शेळके

मला पोलीस यंत्रणेचे रात्रंदिवस संरक्षण आहे. असं असताना मी गुन्हेगारांशी का संबंध ठेऊ? मी नको त्या गोष्टींकडे लक्ष का देऊ? कोणी कोणाच्या जीवावर उठेल याचा अर्थ सुनील शेळके अशा प्रवृत्तीच्या जवळ कधीच जाणार नाही. मी चौकशीतून जे सत्य समोर येईल ते मी स्वीकारेन. मात्र नको तशा बातम्या प्रसारित करू नका. मी उद्याच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्रांशी ही याबाबत चर्चा करणार आहे. या हत्येतील जे गुन्हेगार आहेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन पोलिसांकडे मागणी करायला हवी, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget