एक्स्प्लोर
अजूनही बरंच शिकायचं आहे, देशासाठी खेळणं अभिमानास्पद: केदार जाधव
पुणे: टीम इंडियाच्या इंग्लंडवरील वन डे विजयाचा शिल्पकार केदार जाधवचा आज पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणेकर केदारनं इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेत धमकेदार खेळानं क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं होतं आणि मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता. त्या कामगिरीसाठीच पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघातर्फे केदारचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, यावेळी 'एबीपी माझा'ला दिलेल्या खास मुलाखतीत केदारनं आपला आजवरचा प्रवास उलगडला.
प्रश्न: केदार तुझ्या आयुष्यात आता किती बदल झाला आहे?
उत्तर: खूप बदल झाला आहे. आता खूप कमी वेळा बाहेर फिरता येतं. घराबाहेरही आता सतत सुरक्षारक्षक असतात. पण लोकांचं प्रेम असतं त्यांना टाळता येत नाही. पण मला माझ्या सरावावरही लक्ष द्यायचं असतं. पण लोकांचं एवढं प्रेम पाहून खूप चांगलं वाटतं.
प्रश्न: तू तुझ्या फिटनेसवर कसं लक्ष देतो.
उत्तर: लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मला आणखी मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे मला डायटवर लक्ष द्यावं लागतं. माझ्या शरीराला जशी गरज आहे त्याप्रमाणातच मी खातो. ज्या गोष्टी माझ्या शरीराला हानिकारक आहेत ते खाणं मी टाळतो.
प्रश्न: त्या दिवशी तू तिळगुळातील अक्षरश: एक कण तीळ खाल्लास, यश मिळविण्यासाठी क्रिकेटरला किती त्याग करावा लागतो?
उत्तर: बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण देशासाठी खेळणं हे फिलिंगच वेगळी असतं. त्यापुढे तुमचा त्याग काहीच वाटत नाही. तिळगुळाचं म्हणालं तर, तिळगुळाची अख्खी वडी खाल्ली पाहिजे असं काही नाही. तर त्यादिवशी मोठ्यांचे आशीवार्द घेणं महत्वाचं आहे. त्यामागच्या भावना महत्वाच्या.
प्रश्न: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर विराट आणि धोनी या दोघांकडून तुला कशी शबासकी मिळाली?
उत्तर: दोघंही महान क्रिकेटपटू आहेत. मी दोघांचाही मोठा चाहता आहे. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात. धोनीभाई असे आहेत की, जसे घरात मोठी व्यक्ती असते ना की जे, लहान मुलांना मजा मस्ती करु देतात. पण जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा ते म्हणतात की, ठीक आहे, तुमच्याकडून झालं नाही काही हरकत नाही. मी तर करतोच आहे ना.
पण विराटची स्टाईल थोडी वेगळी आहे. त्याला पुढं राहून जिंकणं आवडतं. तुम्हाला जर त्याच्या संघाला हरवायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला त्याला बाद करावं लागेल. शेवटी दोघांची स्टाईल वेगळी आहे. पण दोघंही महान खेळाडू आहे.
प्रश्न: न्यूझीलंडच्या मालिकेनं तुला कसा आत्मविश्वास मिळाला.?
उत्तर: न्यूझीलंडच्या मालिकेत मी मोठ्या खेळी करु शकलो नाही. पण मला ज्या संधी मिळाल्या त्यामुळे आत्मविश्वास मिळाला. त्याचाच फायदा मला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत झाला.
प्रश्न: फलंदाजी करताना तुला सहावा क्रमांक आवडू लागला आहे, तिथं बॅटिंग करणं किती आव्हानात्मक आहे?
उत्तर: पूर्वी धोनीभाई तिथं खेळायचे आता ते स्वत: वर फलंदाजी करतात. त्यामुळे आता जबाबदारी घेणं गरजेचं आहे. या क्रमांकावर खेळणं मला आवडत असल्यानं मी खूश आहे. जेवढं जास्त क्रिकेट खेळत राहिन तेवढा मी त्या क्रमांकासाठी परिपक्व बनेन. अजूनही बरंच काही शिकायचं आहे.
प्रश्न: टेनिस बॉल क्रिकेटपासून तू आंतरराष्ट्रीय क्रिकेटरपर्यंत पोहचलास. टेनिस क्रिकेट किती महत्वाचं आहे?
उत्तर: टेनिस क्रिकेट खेळताना खेळपट्टी कधी चांगली नसते. मैदानही ओबडधोबड असतं. त्यामुळे अतिशय वाईट परिस्थितीतही तुम्हाला खेळण्याची एक सवय लागते. तसंच टेनिस क्रिकेटच्या मॅचेसही कमी ओव्हरच्या असतात. त्यामुळे पहिल्या बॉलपासून तिथं फटकेबाजी करावी लागते. त्यामुळे मोठे फटके आता खेळता येतात.
प्रश्न: तू षटकार, चौकार ठोकतोस. विराटला तुझे कोणते दोन शॉट आवडले होते?
उत्तर: पुण्याच्या मॅचनंतर विराट मला म्हणाला होता की, कव्हर्सवर आदिल रशीदला जो सिक्स मारला आणि मोईन अलीला बॅकफूटवरुन चौकार ठोकला. हे दोन फटके विराटला फार आवडले होते. पण टेनिस बॉल क्रिकेटमुळेच मी आखूड टप्प्याचे चेंडू चांगले खेळू शकतो.
प्रश्न: तीनही प्रकारच्या क्रिकेटसाठी पुढच्या काळात तुझं काय प्रयत्न असणार आहेत, त्यासाठी कशी मेहनत घेत आहेस?
उत्तर: वेगळी अशी मेहनत घ्यावी लागणार नाही. पण मी जे आजपर्यंत करत आलो तेच मला करायचं आहे. जर मला कसोटी क्रिकेट खेळायचं असेल तर आणखी शिस्तशीर व्हावं लागेल.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement