पुणे : फळांचा राजा आंबा पुण्यातील मार्केटमध्ये दाखल झाला आहे. यंदाच्या मोसमातील पहिला कर्नाटक हापूस जातीचा आंबा पुण्यात दाखल झाला आहे. यंदा पंधरा दिवस आधीच हा आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे.

कर्नाटक हापूस जातीच्या आंब्याला सातशे ते आठशे रुपये प्रतिडझन भाव मिळाला आहे. याशिवाय बदाम, सुंदरी, लालबाग या जातीचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. पुणेकर हा आंबा चाखण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.

यापूर्वी हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथली शेतकरी उदय नरवडकर यांनी आपल्या शेतातील हापूस आंबा आज धनत्रयोदशीच्या दिवशी मार्केट मध्ये आणला होता. चार डझन आंब्याला 11 हजार रुपये दर मिळाला. म्हणजे अडीच हजार रुपयांनी हा आंबा विकला गेला. क्रॉफर्ड मार्केट चे व्यापारी वरीस यांनी हे आंबे विकत घेतले.