पुण्यात जाहिरातीचा फलक पडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झालं आहे. ही ड्रिल मशिन जर रस्त्यांवरुन जात असलेल्या वाहनांवर पडली असती तर या भल्या मोठ्या ड्रिल खाली अनेक वाहनांचा चुराडा झाला असता. हे काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. मेट्रो प्रशासन मात्र याबाबत उदासीन असल्याचं वेळोवेळी दिसून येत आहे.
काही दिवसापूर्वीच पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. या चौकातून निघालेल्या पाच रिक्षा आणि एका कारमधील प्रवासी होर्डिंग्जच्या अँगल्सखाली आले होते. त्याचीच पुनरावृती आज होता-होता राहिली. मात्र आजच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.