एक्स्प्लोर
खंडाळ्याजवळ रेल्वे रुळावरुन घसरल्याच्या प्रकरणाची चौकशी
मुंबई- पुणे रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तरी या प्रकरणी मुंबईचे डीआरएम एस. के. जैन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुणे: मुंबई- पुणे रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तरी या प्रकरणी मुंबईचे डीआरएम एस. के. जैन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. घसरलेल्या एक्स्प्रेसचा डबा हलवण्यात तब्बल अकरा तास लागले. डब्बा हलवल्यानंतर या ठिकाणाचे रूळ खचलेले निदर्शनात आले. यामुळे अद्याप या मार्गावरील डाऊन लाईन बंद आहे. यासाठी आणखीन किती वेळ लागणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. मदुराई एक्स्प्रेस घसरण्याची घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. यामुळे रेल्वेला तीन एक्सप्रेस रद्द करण्याची वेळ आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याच ठिकाणी मालगाडीच्या सहा बोगी घसरल्या होत्या. तेंव्हा या ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती. पण वर्षभराच्या आतच याच ठिकाणी पुन्हा अशीच घटना घडलीय. म्हणूनच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















