पुणे :  पुणे विद्यापीठात नाटकावरुन झालेल्या राड्यानंतर अखिल भारतीय  (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यांनी ललित कला केंद्राची तोडफोड केली आणि ललित कला केंद्राच्या बंद दरवाज्यावर शाईफेक करुन या कार्यकर्त्यांनी दरवाज्याच्या काचा फोडल्या. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अभविपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या ललित कला केंद्राच्या परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


एकीकडे पुणे विद्यापीठात नाटकावरुन झालेल्या राड्यानंतर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्यासह  (Savitribai Phule Pune University)  सहा जणांना नाटकाबाबत अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि डॉ. प्रविण भोळे यांच्यासह आरोपी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.  त्यामुळे आरोपींना जामीन मिळवण्यासाठी लगेच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र हे सगळं घडत असताना  ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ललित कला केंद्राच्या परिसरात मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चामध्ये थेट अभविपचे कार्यकर्ते आले त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. 


नेमकं काय आहे प्रकरण?


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 'जब वी मेट' हे प्रायोगिक नाटक काल सादर करण्यात आलं आहे. या नाटकात रामायणात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक,  काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि डॉ. प्रविण भोळे यांच्यासह आरोपी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या नाटकांत राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती. त्यामुळे हा सगळा राडा झाला.


इतर महत्वाची बातमी-


Pune News : पुणे विद्यापीठात नाटकावरुन राडा; ललित कला केंद्राच्या प्रमुखांसह सहा जणांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी!