एक्स्प्लोर

Indrayani River Pollution : वारकऱ्यांची जीवनदायिनी घेणार मोकळा श्वास, इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर तात्काळ कारवाई करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंद्रायणी नदीच्या प्रदुषणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता आळंदीकरांची या इंद्रायणी नदीच्या प्रदुषणापासून मुक्तता होण्याची शक्यता आहे.

आळंदी, पुणे : वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी (Indrayani River) वरील प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. यावर आता इंद्रायणी नदीच्या प्रदुषणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता आळंदीकरांची या इंद्रायणी नदीच्या प्रदुषणापासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आज आळंदी दौऱ्यावर आहे. फडणवीसांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

मागील काही महिन्यांत इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न नागरिकांनी सरकार दरबारी अनेकदा मांडला होता. मात्र यावर कोणतीही करवाई होताना दिसली नाही अनेक राजकीय नेत्यांनी यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले मात्र प्रदुषणाचं प्रमाण वाढतानाच दिसत आहे. संपूर्ण नदी फेसाळलेली दिसते. या नदीच्या प्रदुषणामुळे आळंदीतील हजारो नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं अनेकदा नागरिकांनी बोलून दाखवलं आहे. 

आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन स्थानिकांना या पाण्यामुळं आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत. त्यांनी काही कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र प्रदुषण कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता थेट देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे प्रदुषण दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देणार

आळंदीत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा  उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी केली. वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकांपर्यंत पेाहोचविण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून  भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचविण्याचे कार्य केले जाते, असंही ते म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला; पोलीस दलात खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Sehlke : आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी? आरोप-प्रत्यारोप अन पोलिसात तक्रारी!
आमदार सुनील शेळके आणि आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी?
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget