Pune Indrayani Rever : पुण्याच्या (Pune) आळंदीतील इंद्रायणी नदीत (Indrayani River) थेट महिला पोलिसाने उडी मारली. हे पाहून एका तरुणाने त्या पोलिसास पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र तो अपयशी ठरला. आता पोलीस (Police) आणि बचाव पथकांकडून शोध कार्य सुरू आहे. अनुष्का केदार असं या महिला पोलिसाचे नाव असून त्या पुणे ग्रामीणच्या मुख्यालयात त्या कार्यरत होत्या,  पण गेली दोन दिवस त्या कर्त्याव्यावर नव्हत्या. दरम्यान, महिला पोलिसांने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


वैयक्तिक कारणांमुळे महिला पोलिसाने हे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती


अधिकची माहिती अशी की, दोन दिवसांपासून कर्तव्यावर नसलेल्या अनुष्का केदार यांनी आळंदी लगतच्या वडमुखवाडीतील घरातून त्या आज सायंकाळी चारच्या सुमारास बाहेर पडल्या अन् थेट इंद्रायणी नदीचा पूल गाठला. त्याच पुलावर उभं राहून एका मित्राला फोन लावला आणि मी आत्महत्या करत असल्याचं सांगून थेट नदीत उडी घेतली. हे एका तरुणाने पाहिले अन त्याने जीवाची पर्वा न करता, त्याच वाहत्या प्रवाहात उडी घेतली. वाहून जाणाऱ्या महिला पोलिसाला वाचवण्याचे तरुणाने सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र तो अपयशी ठरला. आता आळंदी पोलीस आणि बचाव पथकांकडून शोध कार्य सुरू आहे. दुसरीकडे आळंदी पोलिसांनी कुटुंबियांकडून माहिती घेतली असता वैयक्तिक कारणांमुळे महिला पोलिसाने हे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Cabinet Decision : उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना, मंत्रिमंडळ बैठकीत 15 मोठे निर्णय