Sharad Pawar : आपल्या संतानी लिहलेलं धन ही महाराष्ट्राची जमेची बाजू असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. वारकरी कशाचीही पर्वा न करता पिढ्यान पिढ्या पंढरीची वारीसाठी माऊलींच दर्शन घेऊन पंढरपूकडे (Pandharpur) विठ्ठलाचे (Shri Vitthal) दर्शन घेण्यासाठी निघतात असे पवार म्हणाले. मी देखील पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो, पण मी कधीही गाजावाजा नाही करत नाही. पांडुरंगाचं दर्शन करायला जातो हे काय जगाला सांगायचं गरज नाही. प्रसिध्दीपेक्षा दर्शन समाधानकारक असतं असेही शरद पवार म्हणाले. 


मी आस्तिक की नास्तिक याबाबत बऱ्याचदा बोललं जातं असे शरद पवार म्हणाले. मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा करत नाही असे शरद पवार म्हणाले. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर सगळ्या जगाला कळालं पाहिजे असं काही नाही असे पवार म्हणाले. मी प्रसिद्धीच्या भागात कधी पडत नसल्याचे शरद पवार म्हणाले. 


वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी


मला पोलिसांनी इथे येण्याच्या आधी विचारलं की तुम्ही जाणार आहेत का? मी म्हणलं हो जाणार आहे. काही लोकांना मी जाणार म्हणून अस्वस्थता जाणवली पण हे जे लोकं आहेत पांडुरंगाचे खरे भक्त आहेत का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी आहे. पांडुरंगाच्या नावाने व्यवसाय करणाऱ्या घटकांना मी पांडुरंगाचा भक्त मानत नाही असेही शरद पवार म्हणाले. 


 तुकाराम महाराज यांनी नेहमी उपेक्षितांच्या विचारांची भूमिका मांडली


मी आज भाषण करायला नाही, ऐकायला आलो असल्याचे शरद पवार म्हणाले. आज महत्त्वाची गरज म्हणजे एक समाज तयार व्हायला पाहिजे. तो समाज पुरोगामी पाहिजे असे शरद पवार म्हणाले. वारकरी संप्रदाय म्हणून काम करणारे अनेक लोकं आहेत. त्यांचे विचार ऐकणयची अनेक वेळा संधी येते. ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते जात, धर्म बघून भूमिका घेतात असेही पवार म्हणाले. समाजाचा विकास करणारा विचार करणारी लोकं आज सुद्धा आहेत. चुकीच्या प्रवित्तीला आळा घालण्याचा प्रयत्न आपण करु शकतो असेही पवार म्हणाले. अध्यात्मिक आघाडी महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांचे विचार आपण ऐकले. तुकाराम महाराज यांनी नेहमी उपेक्षितांच्या विचारांची भूमिका मांडल्याचे शरद पवार म्हणाले.


देशात एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी नामदेव महाराजांचे महत्त्व आहे. संतांनी लिहलेले धन याचे आपण जतन केलं पाहिजे. पंढरीच्या वारीमध्ये वारकरी कधी ही कुठल्या विषयाचा विचार करत नाही. पांडुरंगाचे दर्शन होवो किंवा नाही नामदेव पायरीचे दर्शन व्हावे ही त्यांची इच्छा असते असे शरद पवार म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar: विधानसभेला लढणार अजितदादांकडून, पण पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी; अतुल बेनकेंनी सस्पेन्स वाढवला