पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत वाढवून 50 रुपये केली आहे. रेल्वेच्या निर्णयानंतर सोशल मीडियापासून राजकीय नेत्यांमध्येही यावरून चर्चा होताना दिसली. प्लॅटफॉर्म तिकीटाच्या किंमतीत अचानक पाचपटीने वाढ झाल्यामुळे सर्वांना धक्काच बसला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर अचानक वाढवण्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गर्दी कमी करण्यासाठी आणि अनावश्यक कामासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करणाऱ्यांना रोखण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.


रेल्वे प्रवक्त्यांनी ट्वीट करत सांगितलं की, 'पुणे जंक्शनवरील प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर 50 रुपये करण्याचा मुख्य उद्देश अनावश्यक कारणासाठी स्थानकावर गर्दी करणाऱ्यांवर रोख लावणं हाच आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच पालन करणं शक्य होईल. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच अशाप्रकारे नियंत्रित करण्यात आले आहेत.'





दिग्विजय सिहं यांचा भाजपवर निशाणा


पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवल्यानंतर सोशल मीडियावर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी याबाबत ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, 'काँग्रेस सरकारच्या वेळी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट 3 रुपये होतं, भाजपच्या राज्यात 50 रुपये झालं आहे.'





दरम्यान, प्लॅटफॉर्म तिकिट दोन तांसासाठी चालू शकतं. जर तुम्ही रेल्वे स्थानकावर तुमच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी जात असाल तर प्लॅटफॉर्म तिकिट घेतल्यापासूनप्ल दोन तासांपर्यंत तुम्ही प्लॅटफॉर्मवर थांबू शकता. दोन तासांपेक्षा जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर थांबलं तर दंड आकारला जाऊ शकतो.


महत्त्वाच्या बातम्या : 


पुण्याची हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं वाटचाल, मात्र पुणे शहरात देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण


पुण्यातील जम्बो हॉस्पिटलची डेडलाईन हुकली; पाऊस आणि तांत्रिक बाबींमुळे विलंब