बारामती: राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या. त्यापैकी काही घटनांचा आजही पुनरुच्चार होताना दिसतो. आज बारामतीमध्ये (Baramati) कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी (KVK) प्रदर्शनाच्या निमित्ताने राजकारणात फूट पडलेलं पवार कुटूंब एकत्र आल्याचं दिसून आलं, शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह अन्य काही नेते, मंत्री आज एकाच व्यासपीठावर दिसून आले. या कार्यक्रमावेळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) कामांचं, त्यांच्या पहाटेच्या वेळी कामाला लागण्याच्या सवयीचं कौतुक करत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत मी कायम त्यांच्यासोबत उभा असेन, असं म्हटलं आहे. 


नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?


बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्या सकाळी लवकर कामाला लागण्याच्या सवयीचं तोंड भरून कौतुक केलं. त्यावर बोलताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, अजित दादांनी रात्री मला सांगितलं एक दिवस तसदी घ्यायला लागेल. मी म्हटलं दादा जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठे उपस्थित राहतो, नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा मीच पाठीमागे उभा होतो. माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित यामध्ये एकच हशा पिकला, अजित पवार देखील स्टेजवरून कोकाटेंकडे पाहत हसताना दिसले. 


पहाटेच्या शपथविधीच्या फोटोत पाहा दादांच्या मागे मीच उभा...


वेळ असेल आणि काम असेल तर लवकर उठणे ही काळाची गरज आहे. बारामतीतील हे आधुनिक तंत्रज्ञान आणि डेमो यांची प्रत्यक्ष कर आज पाहिली या काळामध्ये सर्व गोष्टी गरजेनुसार घडत आहेत. मी देखील हाडाचा शेतकरी आहे असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या शेतीची आठवण सांगितली. त्याचबरोबर एव्हढ्या सकाळी उठण्याची ही माझ्या आयुष्यातील पहिलीच वेळ होती. दादांना माहीती आहे मी उशिरा उठतो, पण, गरज असेल तेंव्हा मी खाद्याला खांदा लावून उभा असतो. खोटं वाटत असेल तर, पहाटेच्या शपथविधी आठवा. पहाटेच्या शपथविधीच्या फोटोत पाहा दादांच्या मागे मीच उभा आहे. ⁠कोकटेंच्या या वाक्यावर अजित पवार यांनी स्टेजवर बसलेल्या जागेवरुनच लगेचच खुलासा केला. अरे तो पहाटेचा शपथविधी नव्हता. आठ वाजता होता, असं अजितदादा यावेळी म्हणाले. 


शेतकऱ्यांना मिळणारे योजना आणि शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान डीबीटी च्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येईल याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. भविष्यकाळात येणाऱ्या योजना आणि ऑनलाईन पद्धत याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. एकीकडे आपण उत्पादन वाढवतोय तर दुसरीकडे उत्पादन वाढलं की भाववाढ कमी होते मार्केटचा हा एक गुण आहे त्याला उगवूनही म्हणू शकतात. कधी कधी कांदे बटाटे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले जातात उत्पादन वाढलं की हा प्रॉब्लेम निर्माण होतो लागवडी मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे त्यावर सुद्धा कंट्रोल आणण्याची गरज आहे. पिक पद्धत बदलण्याची गरज आहे.वेगवेगळ्या शेतीत प्रयोग आणि लागवड करणे देखील गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे शेती केल्याने उत्पादन वाढीस मदत होऊ शकते.


बारामतीचा हा भाग आणि आमचा भाग सारखाच आहे. दुष्काळी आहे, मात्र इकडे शरद पवार आणि अजितदादा यांच्या प्रयत्नांमुळे पाणी आलं. आमचा भाग मात्र तसाच राहिला. पण सर्वत्र परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विमा देत असताना आम्ही एक रुपयात विमा दिला. मात्र, त्यामध्येही काही भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती मीडियाने दिली आहे, त्याची चौकशी केली जाणार आहे, यासाठी लवकरच पोर्टल काढलं जाणार आहे, त्याला आधार लिंक केले जाणार आहे, फवारणी करतांना पाठीवरचे स्प्रे आता बंद केले पाहिजेत, आता ड्रोन वापर मोठ्या प्रमाणावर आहेत, अशा अनेक योजना देण्याचा प्रयत्न करू असंही पुढे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.