एक्स्प्लोर

स्लिम-ट्रीमचा अट्टाहास, पुणेकर नवऱ्याने बायकोला उपाशी ठेवलं

बायकोचे वजन वाढल्यामुळे तिला उपाशी ठेवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कोंढवा येथे समोर आला आहे.

पुणे : पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराची एक वेगळीच घटना समोर आली आहे. बायकोचे वजन वाढल्यामुळे तिला उपाशी ठेवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या कोंढवा येथे समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी, पैशांसाठी, मूल होत नाही म्हणून बायकोचा छळ झाल्याच्या असंख्य घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. परंतु कोंढवा परिसरातील उंड्री येथे हा वेगळा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. त्यावरून तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांचे जून 2006 मध्ये लग्न झाले होते. हे जोडपे उंड्री येथील इस्टेट इस्टोनिया सोसायटीत रहात होते. लग्नानंतर सहा महिन्यातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरून भांडणे होऊ लागली. तसेच दरम्यानच्या काळात फिर्यादी महिलेचे वजन वाढले होते. ते वाढलेले वजन कमी व्हावे यासाठी आरोपीने तिला जबरदस्तीने उपाशी ठेवले. हा प्रकार कित्येक दिवस सुरूच होता. याबरोबरच आरोपीने पत्नीच्या आई-वडिलांची बदनामीदेखील केली. 2006 ते 2016 दरम्यान सातत्याने त्या महिलेला आरोपीने त्रास दिला. त्यानंतर अचानक राहत्या घरातून निघून गेला. तो सध्या बावधन येथे राहत आहे. त्याने उंड्री येथील घर सोडल्यानंतर पत्नीला घटस्फोटासाठीचा अर्ज पाठवला. मात्र, फिर्यादी महिलेला घटस्फोट नको आहे. त्यामुळे समुपदेशकाकडे त्यांच्या समुपदेशनाच्या काही फेऱ्या झाल्या. मात्र, त्यासही पतीने दाद दिली नाही. त्यामुळे तिने पोलिसांत फिर्याद दाखल केली. मुलांच्या संगोपनाचा प्रश्न फिर्यादी महिला आणि तिचा पती दोघेही खासगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांना दोन मुले आहेत. तिचा छळ करून पती तिला न सांगता घरातून निघून गेल्यानंतर ती मुलांसह एकटीच राहत होती. मात्र, त्यानंतर तिच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तसेच, पत्नी राहत असलेला फ्लॅट विकण्यासाठी आरोपीने तिच्यावर दबाव आणला. गेल्याच महिन्यात त्या महिलेची नोकरीदेखील गेली असून, तिच्यापुढे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत मुलांचा सांभाळ कसा करणार? कुठे राहणार? हे प्रश्न तिला भेडसावू लागल्याने तिने अखेर पोलिसांत धाव घेतली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचं पहिलं लँडिंग रद्द, दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला, फ्लाईटरडारच्या फोटोतून अपघातापूर्वीच्या घडामोडी समोर
अजित पवारांच्या विमानाचं पहिलं लँडिंग रद्द, दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला, अपघातापूर्वीचा फ्लाईट रडारचा फोटो समोर
Ajit Pawar Baramati Plane Crash: दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची, हादरलेल्या पवार कुटुंबासमोर प्रश्न, रुग्णालयातून घरी येताच संयम सुटला!
मोठी बातमी : दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची, हादरलेल्या पवार कुटुंबासमोर प्रश्न, रुग्णालयातून घरी येताच संयम सुटला!
Ajit Pawar Plane Crash Dhananjay Munde: नि:शब्द! अजित पवारांच्या अकाली जाण्यानं धनंजय मुंडेंचा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले, दादा...
नि:शब्द! अजित पवारांच्या अकाली जाण्यानं धनंजय मुंडेंचा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले, दादा...
Ajit Pawar Plane Crash: धावपट्टीवर उतरायला 100 फूट अंतर बाकी, क्षणार्धात विमानाचे तुकडे तुकडे; अजित पवारांसह विमानात कोण होतं ?
धावपट्टीवर उतरायला 100 फूट अंतर बाकी, क्षणार्धात विमानाचे तुकडे तुकडे; अजित पवारांसह विमानात कोण होतं ?

व्हिडीओ

Ajit Pawar Plane Accident News : हजारो कार्यकर्ते जमले, बारामतीत रुग्णालयाबाहेर परिस्थिती काय?
Devendra Fadanvis On Ajit Pawar : एक दमदार, दिलदार मित्र सोडून गेला, अजितदादांच्या निधनाने फडणवीस भावूक
Ajit Pawar Plane Accident Baramati : बारामती विमान अपघातात, अजितदादांचा मृत्यू
Eknath Shinde On Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक
Sanjay Shirsat On Ajit Pawar : अजित पवार यांच्या जाण्याने धक्का बसला, शिरसाटांकडून श्रद्धांजली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचं पहिलं लँडिंग रद्द, दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला, फ्लाईटरडारच्या फोटोतून अपघातापूर्वीच्या घडामोडी समोर
अजित पवारांच्या विमानाचं पहिलं लँडिंग रद्द, दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला, अपघातापूर्वीचा फ्लाईट रडारचा फोटो समोर
Ajit Pawar Baramati Plane Crash: दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची, हादरलेल्या पवार कुटुंबासमोर प्रश्न, रुग्णालयातून घरी येताच संयम सुटला!
मोठी बातमी : दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची, हादरलेल्या पवार कुटुंबासमोर प्रश्न, रुग्णालयातून घरी येताच संयम सुटला!
Ajit Pawar Plane Crash Dhananjay Munde: नि:शब्द! अजित पवारांच्या अकाली जाण्यानं धनंजय मुंडेंचा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले, दादा...
नि:शब्द! अजित पवारांच्या अकाली जाण्यानं धनंजय मुंडेंचा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले, दादा...
Ajit Pawar Plane Crash: धावपट्टीवर उतरायला 100 फूट अंतर बाकी, क्षणार्धात विमानाचे तुकडे तुकडे; अजित पवारांसह विमानात कोण होतं ?
धावपट्टीवर उतरायला 100 फूट अंतर बाकी, क्षणार्धात विमानाचे तुकडे तुकडे; अजित पवारांसह विमानात कोण होतं ?
Ajit Pawar Baramati Plane Crash: अजितदादांची बारामतीत भीषण विमान अपघातात अकाली एक्झिट; 'उद्ध्वस्त' म्हणत एकाच शब्दात सुप्रिया सुळेंचा भावना अन् अश्रुंचा बांध फुटला
अजितदादांची बारामतीत भीषण विमान अपघातात अकाली एक्झिट; 'उद्ध्वस्त' म्हणत एकाच शब्दात सुप्रिया सुळेंचा भावना अन् अश्रुंचा बांध फुटला
Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे अनेक नेते काळानं हिरावून नेले, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आता अजित पवार : संजय राऊत
अजित पवार यांचं बोलणं, कामाची पद्धत, प्रशासनावरील पकड महाराष्ट्राच्या मनात कायम राहील : संजय राऊत
Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील 'दादा' पर्वाचा बारामतीत करुण अंत
भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील 'दादा' पर्वाचा बारामतीत करुण अंत
Ajit Pawar Dead Baramati Plane Crash: अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget